Posted On:
06 NOV 2026 9:14AM by PIB Mumbai
गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई), कोलकाता यांनी बांधलेली स्वदेशी बनावटीची ‘अमिनी’ ही पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) 05 नोव्हेंबर 2026 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.
एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी (एक्स-जीआरएसई) हे इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (आयआरएस) च्या वर्गीकरण नियमांनुसार जीआरएसई कोलकाता द्वारे डिझाइन आणि तयार करण्यात आले आहे.
ही जहाजे वॉटरजेट्सद्वारे चालणाऱ्या भारतीय नौदलाच्या सर्वात मोठ्या युद्धनौकांपैकी एक असून, ती अत्याधुनिक हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लाँचर आणि सोनारने सुसज्ज आहेत, यामुळे पाण्याखालील धोक्यांचा प्रभावीपणे शोध घेणे आणि त्यांच्याशी सामना करणे शक्य होते. हे जहाज नौदलाच्या पाणबुडीविरोधी, किनारपट्टीवरील टेहळणी आणि सुरुंग पेरण्याच्या क्षमतांना अधिक बळकट करेल.
‘अमिनी’ हे नाव लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील अमिनी बेटावरून ठेवण्यात आले आहे. हे जहाज 2002 मध्ये भारतीय नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या, आयएनएस अमिनी या पेट्या III श्रेणीतील पाणबुडीविरोधी युद्धनौकेची परंपरा पुढे नेईल. युद्धनौकेचे हे नाव, नौदलाची आपला दिमाखदार वारसा जपण्याची परंपरा पुढे नेत आहे.
'अमिनी' या युद्धनौकेचे भारतीय नौदलाकडे सुपूर्त होणे, हा केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेच्या अनुषंगाने भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री असलेले हे जहाज, देशांतर्गत संरक्षण उत्पादन परिसंस्थेची वाढती ताकद आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होत असल्याचे निदर्शक आहे.
_20261106091644_f62853.jpeg)
_20261106091657_fc7036.jpeg)
_20261106091715_8125bb.jpeg)
_20261106091726_a168f6.jpeg)
*****
Neha Kulkarni / Rajashree Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai