Posted On:
05 NOV 2026 7:55PM by PIB Mumbai

ऑनलाईन ‘नशा मुक्त युवा, विकसित भारत प्रश्नमंजुषेला ' अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून, 5 नोव्हेंबर , 2026 पर्यंत यात 16,517 हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. हा वाढता सहभाग, विशेषतः युवकांचा वाढता सक्रिय सहभाग, ‘नशा मुक्त भारत’ घडवण्याच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे ‘नशा मुक्त भारत अभियाना’अंतर्गत 26 ऑक्टोबर, 2026 रोजी ही प्रश्नमंजुषा सुरू करण्यात आली. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नागरिकांना, विशेषतः युवकांना, ‘नशा मुक्त भारत’ बनवण्यात सक्रिय योगदान देण्यास प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ही प्रश्नमंजुषा 26 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित केली जात असून, ती सर्व नागरिकांसाठी खुली आहे. सहभागी व्यक्ती 'MY Bharat' पोर्टलद्वारे या प्रश्नमंजुषेत भाग घेऊ शकतात.

सहभागासाठी लिंक:
https://mybharat.gov.in/quizzes/yuva/detail/Url9dlIwCinQVSf8lwPB9w/
15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू करण्यात आलेल्या 'नशा मुक्त भारत अभियाना'चा उद्देश प्रतिबंधात्मक शिक्षण, जनजागृती, उपचार, पुनर्वसन आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून अमली पदार्थांची मागणी कमी करण्याच्या प्रयत्नांना बळ देणे हा आहे. सुरुवातीला 272 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले हे अभियान आता देशातील सर्व जिल्ह्यांपर्यंत विस्तारले आहे.

हे अभियान 13.99 कोटी युवक आणि 10.91 कोटी महिलांसह 35.09 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे. या अभियानातून होणारी जनजागृती आणि उपक्रमांची देशव्यापी व्याप्ती यातून दिसून येते.

या अभियानांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये 32.43 लाखांहून अधिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. तसेच, देशभरात कार्यरत असलेल्या 'सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागा'च्या पाठिंब्यासह 755 हून अधिक नशामुक्ती केंद्रांच्या माध्यमातून 39.91 लाख व्यक्तींवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. 'नशा मुक्त' प्रतिज्ञांची एकूण संख्या 45.07 लाखांच्या वर गेली असून, 2 लाखांहून अधिक 'नशा मुक्ती मित्र' नोंदणीकृत आहेत.


माय भारत प्रश्नमंजुषा क्यूआर
हे अभियान आपल्या सातव्या वर्षात पदार्पण करत असताना, या प्रश्नमंजुषाचा उद्देश अंमली पदार्थांच्या सेवनाचे हानिकारक परिणाम याबद्दलची जनसामान्यांमधील समज अधिक सखोल करणे, सुजाण निर्णय घेण्यास प्रोत्साहन देणे आणि तरुणांना जागरूकता व प्रतिबंधाचे सक्रिय दूत बनण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. देशाच्या विकासामध्ये निरोगी व्यक्ती, कुटुंबे आणि समुदायांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे ओळखून हा उपक्रम 'नशा मुक्त भारत' आणि 'विकसित भारत' या संकल्पनेला बळकटी देतो.

***
Radhika Aghor / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai