Posted On:
05 NOV 2026 5:09PM by PIB Mumbai
ट्राय (TRAI), अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सप्टेंबर 2026 मध्ये मुंबई एलएसएमध्ये (परवाना सेवा क्षेत्र) घेण्यात आलेल्या इंडिपेंडेंट ड्राइव्ह टेस्ट (आयडीटी) चे निष्कर्ष सामान्य दूरसंचार ग्राहकांच्या माहितीसाठी जाहीर केले आहेत. या 'ड्राइव्ह टेस्ट'चा उद्देश टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स (टीएसपी), अर्थात दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या मोबाइल नेटवर्क सेवांच्या (व्हॉइस आणि डेटा दोन्ही) रिअल-टाइम (प्रत्यक्ष) गुणवत्तेचे मूल्यमापन करणे आणि ती पडताळून पाहणे, हे या ‘ड्राइव्ह टेस्ट’ चे उद्दिष्ट आहे. आयडीटी दरम्यान, ट्राय (TRAI) दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या (टीएसपी) कामगिरीचे मूल्यमापन सेवेची गुणवत्ता क्यूओएस दर्शवणाऱ्या प्रमुख निकषांच्या आधारे करते. यामध्ये कव्हरेज, कॉल ड्रॉप रेट ((सीडीआर), कॉल सेटअप सक्सेस रेट (सीएसएसआर), डेटा डाउनलोड (डीएल) आणि अपलोड (यूएल) थ्रूपुट इ. यांसारख्या घटकांचा समावेश असतो. त्यानंतर ग्राहकांना माहिती देण्यासाठी आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांना त्यांच्या सेवा सुधारायला प्रोत्साहन देण्यासाठी ते प्रकाशित केले जाते.
हे आयडीटी शहरे, हॉटस्पॉट्स, सार्वजनिक वाहतूक केंद्रे इत्यादींसारख्या विविध सार्वजनिक ठिकाणी, सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या प्रत्यक्ष मोबाइल नेटवर्क कामगिरीची नोंद करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. या प्रकारच्या ड्राइव्ह टेस्टिंगमध्ये, 2G, 3G, 4G आणि 5G नेटवर्कवर सर्व टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या सिम कार्ड्सचा वापर करून लाइव्ह डेटा आणि व्हॉइस सत्रे स्थापित केली जातात. अनेक प्रगत चाचणी हँडसेटचा वापर केला जातो आणि प्रगत सॉफ्टवेअर प्रणालींच्या माध्यमातून सत्रांचे रिअल-टाइम (प्रत्यक्ष) निरीक्षण आणि विश्लेषण केले जाते.
ट्रायने आपल्या नियुक्त संस्थेमार्फत, मुंबई एलएसए मध्ये 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत सिटी ड्राईव्ह- 212.6 किमी आणि हॉटस्पॉट लोकेशन्स – 07, अशा विविध ठिकाणी 'ड्राईव्ह टेस्ट' आयोजित केल्या होत्या. ट्रायच्या बेंगळुरू प्रादेशिक कार्यालयाच्या देखरेखीखाली या चाचण्या घेण्यात आल्या. ड्राइव्ह टेस्ट अहवालात सादर केलेली निरीक्षणे ड्राइव्ह टेस्ट घेण्याच्या दिवशी / वेळी चाचणीचे क्षेत्र / मार्गावरील टीएसपी ची कामगिरी दर्शवतात.

ड्राइव्ह टेस्ट रूट मॅप: खालील नकाशा 'ड्राइव्ह टेस्ट' मार्गांचे विहंगावलोकन देतो, यात नकाशावरील लेजेंड्स (चिन्हे) सिटी ड्राइव्ह, इंटर-ऑपरेटर कॉलिंग, हॉटस्पॉट्स आणि वॉक टेस्ट दर्शवतात.
मूल्यमापनाचे प्रमुख निकष:
1. कव्हरेज गॅप: नमुन्यांची टक्केवारी, ज्यासाठी आढळलेली सिग्नलची तीव्रता ही संबंधित तंत्रज्ञानासाठी (2G/ 3G/ 4G/ 5G) किमान निर्धारित सिग्नल तीव्रतेपेक्षा कमी होती.
2. व्हॉइस सेवा: कॉल सेटअप सक्सेस रेट (सीएसएसआर), ड्रॉप कॉल रेट (डीसीआर), कॉल सेटअप टाइम, कॉल सायलेन्स रेट, स्पीच क्वालिटी (एमओएस).
3. कॉल सायलेन्स इन्स्टन्स: कॉल दरम्यान कॉल सायलेन्सची संख्या.
4. डेटा सर्व्हिस: डाउनलोड / अपलोड थ्रूपुट, लेटेंसी, जिटर, पॅकेट ड्रॉप रेट
मुंबई जिल्ह्यातील मोबाइल नेटवर्कच्या कामगिरीचा, मुख्य निकषांच्या आधारे, थोडक्यात आढावा खाली दिला आहे:-
1. मुंबई जिल्हा
a) कव्हरेजमधील तफावत: ऑटो-सिलेक्शन मोडमध्ये (5G/4G/3G/2G) ड्राईव्ह टेस्ट मार्गावर व्हॉइस चाचणी दरम्यान नोंदवण्यात आलेली सिग्नलची तीव्रता, एकूण गोळा केलेल्या नमुन्यांपैकी खराब सिग्नल तीव्रता असलेल्या नमुन्यांची संख्या—एअरटेलसाठी 0/58003, एमटीएनएलसाठी 13057/3687, आरजेआयएल (RJIL) साठी 0/56138 आणि व्हीआयएल (VIL) साठी 0/58030 अशी होती. कव्हरेज गॅपचा सविस्तर तपशील जोडलेल्या नकाशात देण्यात आला आहे.
b) ड्रॉप झालेले कॉल्स : यशस्वीपणे जोडल्या गेलेल्या एकूण कॉल्सपैकी ड्रॉप झालेल्या कॉल्सची संख्या, एअरटेलसाठी 1/510, एमटीएनएलसाठी 2/32, आरआयएलसाठी 2/509 आणि व्हीआयएलसाठी 0/509 अशी होती. कॉल ड्रॉप झालेल्या ठिकाणांचा तपशील जोडलेल्या नकाशात देण्यात आला आहे.
c) कॉल सायलेन्सच्या घटना : जोडल्या गेलेल्या एकूण कॉल्सपैकी 3 सेकंदांपेक्षा जास्त काळ आवाज बंद पडल्याच्या (सायलेन्स) नोंदी—एअरटेलसाठी 2/479, एमटीएनएलसाठी उपलब्ध नाही, आरआयएलसाठी 3/493 आणि व्हीआयएलसाठी 1/490 अशा होत्या. कॉल सायलेन्सच्या ठिकाणांचा तपशील जोडलेल्या नकाशात देण्यात आला आहे.
d) डेटा डाऊनलोड आणि अपलोड थ्रूपुट:
i) डेटा डाउनलोड कामगिरी (एकंदर): सरासरी डाऊनलोड गती एअरटेलसाठी (5G/4G) 133.86 Mbps, एमटीएनएलसाठी (4G) 0 Mbps, आरआयएलसाठी (5G/4G) 248.93 Mbps आणि व्हीआयएलसाठी (5G/4G/2G) 89.04 Mbps नोंदवण्यात आली. डाऊनलोड थ्रूपुटचा तपशील जोडलेल्या नकाशात देण्यात आला आहे.
ii) डेटा अपलोड कामगिरी (एकंदर): सरासरी अपलोड गती एअरटेलसाठी (5G/4G) 32.80 Mbps, एमटीएनएलसाठी (4G) 0.00 Mbps, आरआयएलसाठी (5G/4G) 33.87 Mbps आणि व्हीआयएलसाठी (5G/4G/2G) 23.21 Mbps नोंदवण्यात आली. अपलोड थ्रूपुटचा तपशील जोडलेल्या नकाशात देण्यात आला आहे.
ड्रॉप झालेले कॉल्स आणि कॉल सायलन्सच्या घटनांची ठिकाणे जोडलेल्या नकाशावरील लाल ठिपक्यांवर क्लिक करून पाहता येतील.
आयडीटी (IDT) दरम्यान समाविष्ट केलेले ड्राईव्ह टेस्ट मार्ग आणि क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
a) शहरः शहराच्या ड्राईव्ह टेस्टमध्ये सायन, चेंबूर, देवन्नार, मानखुर्द गाव, टिळक नगर, पवई, सांताक्रूझ पूर्व, खार पश्चिम, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, मालाड पूर्व, कांदिवली, बोरिवली पूर्व, मिरा रोड पूर्व, भाईंदर पूर्व इत्यादी क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता.
b) हॉटस्पॉट: एकाच जागी स्थिर वापरकर्त्याच्या अनुभवाची नोंद घेणारी हॉटस्पॉट ठिकाणे—अंधेरी रेल्वे स्टेशन, सीएसएमआय विमानतळ - टी2, मुंबई, देवनार मेट्रो स्टेशन, इन्फिनिटी आयटी पार्क, काशीगाव मेट्रो स्टेशन, लोअर ओशिवरा मेट्रो स्टेशन आणि पांडुरंगवाडी मेट्रो स्टेशन ही आहेत.
या आयडीटी अहवालाचे निष्कर्ष संबंधित टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्ससोबत (TSPs) पुढील आवश्यक कारवाईसाठी सामायिक करण्यात आले आहेत. आयडीटीचे सविस्तर अहवाल ट्रायच्या (TRAI) www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी किंवा अतिरिक्त माहितीसाठी adv.bengaluru@trai.gov.in वर ईमेल पाठवता येऊ शकतो किंवा ट्रायच्या बंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयाशी +91-80-22865004 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
परिशिष्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
***
Nitin Fulluke / Rajashree Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai