संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाची ‘सह्याद्री’ युद्धनौका मलाबार 2026 सरावात सहभागी होण्यासाठी जपानच्या योकोसुका नौदल तळावर दाखल

Posted On: 05 NOV 2026 3:23PM by PIB Mumbai

मलाबार 2026 या बहुपक्षीय नौदल सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची आयएनएस सह्याद्री ही क्षेपणास्त्र सज्ज स्टेल्थ युद्धनौका, 04 नोव्हेंबर 2026 रोजी जपानमधील योकोसुका नौदल तळावर दाखल झाली.

जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ) ने या जहाजाचे जोरदार स्वागत केले. यामधून भारत आणि जपान यांच्यातील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी आणि वाढते सागरी सहकार्य प्रतिबिंबित होते. योकोसुका जिल्ह्याचे कमांडंट व्हाईस ऍडमिरल यागी कोजी आणि भारतीय दूतावासाचे उपप्रमुख आर मधू सुदान यावेळी उपस्थित होते.

'मालाबार 2026 मध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलांचा सहभाग आहे. या उपक्रमाद्वारे सहभागी सागरी दलांना बंदरात आणि समुद्रात विविध प्रकारच्या नियोजित सरावातून परस्परांबरोबर परिचालन समन्वय वाढवण्याची, परस्परांची कार्यक्षमता बळकट करण्याची आणि व्यावसायिक कौशल्ये आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. बंदर टप्प्यामध्ये व्यावसायिक संवाद आणि समन्वित नियोजनाचा समावेश असेल, त्यानंतरच्या सागरी टप्प्यामध्ये आयएनएस सह्याद्री आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या सहभागी तुकड्यांचा समावेश असेल. हा सराव परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ करेल, तसेच सुरक्षित आणि स्थिर हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी योगदान देईल.

मालाबार 2026 मधील आयएनएस सह्याद्रीचा सहभाग, सागरी भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या आणि या क्षेत्रातील समान विचारसरणी असलेल्या नौदलांबरोबर सहकार्य वाढवण्याच्या भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो. हा उपक्रम, ‘महासागर (MAHASAGAR)- विविध क्षेत्रांमधील सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वसमावेशक प्रगती’, या दृष्टीकोनाला अनुसरून आहे.

***

Nitin Fulluke / Rajashree Agashe / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333232) अभ्यागत कक्ष : 12