Posted On:
03 NOV 2026 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2026
मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये, पालकांकडून अल्पवयीन मुलींची, दलालांना 3 ते 5 लाख रुपयांना विक्री केली जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. या मुलींना दत्तक घेतल्याचे भासवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली जातात आणि त्याद्वारे मध्यस्थांच्या माध्यमातून त्यांची तस्करी केली जाते. मुली वयात आल्यानंतर त्यांची ओळख लपवण्यासाठी वैयक्तिक माहिती बदलली जाते. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये देहव्यापारासाठी त्यांची 35 ते 40 लाख रुपयांना विक्री केली जात असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
या वृत्तातील माहिती खरी असल्यास, हा पीडित मुलींच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन करणारा प्रकार आहे असे आयोगाने म्हटले आहे. या प्रकरणी आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. तसेच, दोन आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
30 ऑक्टोबर 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पालक गरिबी आणि इतर कारणांमुळे आपल्या मुलींची विक्री करतात. या बातमीत तस्करी झालेल्या अशा मुलींच्या चार विशिष्ट प्रकरणांचा दाखला देण्यात आला आहे.
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai