Posted On:
03 NOV 2026 2:52PM by PIB Mumbai
मुंबई, 3 नोव्हेंबर 2026
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी - प्रादेशिक कॅम्पस (एनएडीटी-आरसी), मुंबई, येथे आज प्राप्तिकर विभागाच्या नव्याने नियुक्त झालेल्या कार्यालय अधीक्षकांसाठी (ओएस) 'नवोदय-2026' या 30 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या तुकडीची सुरुवात झाली. मुंबईतील मिनिस्ट्रियल स्टाफ ट्रेनिंग युनिट्स (एमएसटीयू) येथे 200 प्रशिक्षणार्थींच्या सहभागाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर हे या कॅम्पस चे प्रमुख आहेत.
प्राप्तिकर विभागासाठी हे वर्ष एक महत्वाचा टप्पा आहे, कारण प्रथमच कार्यालय अधीक्षक संवर्गातील पदे प्रथमच थेट भरतीद्वारे भरण्यात आली आहेत. सीबीडीटी कार्यालय अधीक्षक (गट 'बी' पद) भरती नियम, 2024 अंतर्गत पूर्वीच्या वरिष्ठ कर सहाय्यक आणि कार्यालय अधीक्षक या श्रेणींचे विलीनीकरण करून हे संवर्ग तयार करण्यात आले.
20 सप्टेंबर 2026 2026 रोजी आयोजित देशव्यापी रोजगार मेळाव्यानंतर, या अंतर्गत निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये देशभरातील सुमारे 6,626 थेट भरती कार्यालय अधीक्षक या विभागामध्ये रुजू झाले. एकाच वर्षात मंत्रिपद संवर्गासाठी राबवण्यात आलेली ही एक अभूतपूर्व भरती मोहीम आहे.
मुंबई एनएडीटी-आरसी मुंबई या देशव्यापी प्रशिक्षण उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत असून, या अंतर्गत मुंबई आणि पुणे विभागात कार्यालय अधीक्षक पदावर 1,438 उमेदवारांची थेट भरती केली आहे.
मुंबईच्या आयकर -10 च्या मुख्य आयुक्त मीता सिंह यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. नवीन भरती झालेल्यांचे स्वागत करताना, त्यांनी कार्यक्षम, तंत्रज्ञान-आधारित आणि करदाता-स्नेही प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी कार्यालय अधीक्षकांची महत्वाची भूमिका अधोरेखित केली. प्रशिक्षणार्थींनी कायद्यांविषयीचे ज्ञान, कार्यपद्धती आणि कार्यालयीन व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी या कार्यक्रमाचा सर्वोत्तम वापर करून घ्यावा, तसेच सतत शिकत राहावे आणि बदलत्या गरजांनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणावेत, असे त्या म्हणाल्या.

मुंबई येथील नवोदय-2026 च्या उद्घाटनाप्रसंगी, प्राप्तिकर मुख्य आयुक्त- 10 (मुंबई), मीता सिंह यांचे स्वागत करण्यात आले
प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना नवनीत मनोहर यांनी विभागातील यशस्वी कारकीर्दीसाठी प्रामाणिकपणा, सहानुभूती, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि निरंतर कौशल्य विकास या चार प्रमुख तत्त्वांवर भर दिला.
|

Address at the inaugural session, MSTU Mumbai
|

Address at the inaugural session, MSTU Mumbai
|

एमएसटीयू मुंबई येथे नव्याने भरती झालेले कार्यालय अधीक्षक आणि त्यांच्याबरोबर मुख्य अतिथी आणि वरिष्ठ अधिकारी
नवोदय-2026 च्या माध्यमातून, एनएडीटी-आरसी मुंबईने मिशन कर्मयोगीच्या दृष्टीकोनाला अनुसरून, मोठ्या प्रमाणात, गुणवत्तापूर्ण क्षमता बांधणी आणि सक्षम, व्यावसायिक आणि भविष्यासाठी सज्ज मंत्रालयीन मनुष्यबळ विकसित करण्याप्रति आपली वचनबद्धता अधोरेखित केली.
* * *
पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai