पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दृढनिश्चय आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 02 NOV 2026 2:35PM by PIB Mumbai

‍नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिरस्थायी यश संपादन करण्यासाठी दृढनिश्चय आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित आज सामायिक केले.

सुव्याहृतानि धीराणां फलतः परिचिन्त्य यः।

अध्यवस्यति कार्येषु चिरं यशसि तिष्ठति॥

विद्वान आणि ज्ञानी व्यक्तींनी दिलेल्या योग्य सल्ल्याचा परिणाम लक्षात घेऊन, जे आपल्या कार्यात दृढनिश्चयाने आणि चिकाटीने प्रयत्नशील राहतात, ते दीर्घकाळ यशस्वी ठरतात आणि इतिहासात आपले अढळ स्थान निर्माण करतात, असा या सुभाषिताचा आशय आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये हा श्लोक सामायिक केला आहे.

सुव्याहृतानि धीराणां फलतः परिचिन्त्य यः।

अध्यवस्यति कार्येषु चिरं यशसि तिष्ठति॥

नितीन फुल्लुके /निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2331608) अभ्यागत कक्ष : 6