Posted On:
01 NOV 2026 12:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त तेथील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मध्य प्रदेश ही गौरवशाली वारसा, समृद्ध संस्कृती आणि निसर्गरम्य सौंदर्याची भूमी असून, येथील जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे राज्याची ओळख अधिकच समृद्ध करतात, असे मोदी म्हणाले.
मध्य प्रदेशातील जनतेने आपल्या कर्तबगारी आणि उद्योजकतेच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि पायाभूत सुविधांपासून ते नवोन्मेषापर्यंत सर्वच क्षेत्रांत राज्य प्रगतीचे नवे टप्पे गाठत आहे, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी 'X' वरील पोस्ट मध्ये लिहिले:
"मध्य प्रदेशातील सर्व बंधू-भगिनींना राज्य स्थापना दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
आपले हे राज्य गौरवशाली वारसा, समृद्ध संस्कृती आणि अथांग नैसर्गिक सौंदर्याने नटलेली भूमी आहे. येथील जगप्रसिद्ध वारसा स्थळे या राज्याच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालतात.
मध्य प्रदेशातील नागरिकांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. कृषी, उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि पायाभूत सुविधांपासून ते नवनवीन उपक्रमांपर्यंत, हे राज्य दररोज प्रगतीचे नवे शिखर गाठत आहे. आपल्या सर्वांगीण विकासासोबतच 'आत्मनिर्भर भारत' घडवण्यातही राज्याचा मोठा वाटा आहे.
हा विशेष प्रसंग माझ्या या राज्यातील सर्व कुटुंबियांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा!"
***
राधिका अघोर/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai