भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

वेगा एसएएस’कडून व्होडाफोन ग्रुप पीएलसी’मधील काही हिस्सा अधिग्रहित करण्यास भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी

Posted On: 31 OCT 2026 2:17PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने वेगा एसएएस’तर्फे व्होडाफोन ग्रुप पीएलसी मधील काही हिस्सा अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित व्यवहारानुसार, वेगा एसएएस या अधिग्रहणकर्ता कंपनी द्वारे व्होडाफोन ग्रुप पीएलसी या लक्ष्य कंपनीच्या एकूण जारी भाग भांडवलापैकी 16.2% हिस्सा अधिग्रहित केला जाणार आहे.

वेगा एसएएस ही एक होल्डिंग कंपनी असून ती फ्रान्सच्या कायद्यांतर्गत स्थापन झालेली माया एसएएस  या कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही कंपनी दूरसंचार, आंतरजाल, माहिती तंत्रज्ञान, टेलिमॅटिक्स आणि दळणवळण क्षेत्रातील विविध प्रणाली, उपकरणे, नेटवर्क किंवा सेवांची रचना, विकसन, देखभाल, परिचालन, व्यवस्थापन किंवा विपणन करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे; ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक दळणवळण नेटवर्कची स्थापना आणि परिचालनाचाही समावेश आहे.

वेगा एसएएसची स्वतःची भारतात कोणतीही व्यावसायिक उपस्थिती किंवा व्यावसायिक उपक्रम नाहीत, तिचे व्यावसायिक कामकाज तिच्या संबंधित सहयोगी कंपन्यांद्वारे  केले जाते.

व्होडाफोन ग्रुप पीएलसी ही युरोप आणि आफ्रिकेतील एक दूरसंचार कंपनी असून ती या दोन्ही खंडांमध्ये लँडलाईन आणि मोबाइल सेवा पुरवते. कंपनीच्या महसुलाचा मोठा हिस्सा मुख्य कनेक्टिव्हिटी उत्पादने आणि सेवांतून मिळतो. याव्यतिरिक्त, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये डिजिटल सेवा, इंटरनेट ऑफ थिंग्ज  सेवा आणि वित्तीय सेवांचाही समावेश आहे. भारतात ही कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड’च्या माध्यमातून कार्यरत आहे.

***

माधुरी पांगे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330882) अभ्यागत कक्ष : 11