भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

आदित्य बिर्ला रिन्यूएबल्स लिमिटेड’तर्फे सोलेनेर्जी पॉवरच्या 100% जारी भागभांडवलाच्या अधिग्रहणाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी

Posted On: 31 OCT 2026 2:18PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने 'शेल ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट बी.व्ही.' कडून 'सोलेनेर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड'च्या (लक्ष्यित कंपनी) 100% भागभांडवलाचे अधिग्रहण करण्यास 'आदित्य बिर्ला रिन्युअबल्स लिमिटेड'ला मंजुरी दिली आहे.

प्रस्तावित संयोजन हे सह-संबंधित विक्रेत्याकडून लक्ष्यित कंपनीचे 100% भागभांडवल ग्रहण करण्याशी निगडित आहे.

अधिग्रहणकर्ती कंपनी (आणि तिच्या उपकंपन्या) ही सौर आणि पवन अशा नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारे वीजनिर्मिती, तसेच अंतर्गत ईपीसी (Engineering, Procurement, and Construction) कामांच्या व्यवसायात कार्यरत आहे.

लक्ष्यित कंपनी ही मॉरिशसमध्ये नोंदणीकृत असलेली एक होल्डिंग कंपनी आहे. होल्डिंग कंपनीव्यतिरिक्त ती इतर कोणताही प्रत्यक्ष व्यवसाय करत नाही. भारतामध्ये ही कंपनी (i) तिच्या काही दुय्यम (डाउनस्ट्रीम) होल्डिंग कंपन्या; आणि (ii) सौर व पवन ऊर्जा स्रोतांद्वारे प्रत्यक्ष वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमांतून सक्रिय आहे. 

***

माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330880) अभ्यागत कक्ष : 13