नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तराखंडामध्‍ये जोशीमठ येथे मे. ट्रान्सभारत एव्हीएशन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले

Posted On: 30 OCT 2026 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026

जोशीमठ परिसरात चाई गावाजवळच्या जंगलात आज दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी मे. ट्रान्सभारत एव्हीएशन कंपनीतर्फे संचालित VT-HCX (एएस350बी3 प्रकारचे) नोंदणी असलेले हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन कोसळले.

या हेलिकॉप्टरने डेहराडूनमधील सहस्रधारा येथे जाण्यासाठी दुपारी 1 वाजून 14 मिनिटांनी बद्रीनाथ येथील हेलीपॅड वरुन उड्डाण केले. या हेलिकॉप्टरमध्ये एक वैमानिक आणि पाच प्रवासी होते. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले असून लगतच्या परिसरात प्रवाशांचा  शोध घेणे आणि बचाव कार्य जारी आहे.

सदर अपघाताचे प्राथमिक/नियामकीय मूल्यांकन करण्यासाठी नागरी हवाई उड्डाण महासंचालनालयातील अधिकाऱ्यांचे एक पथक डेहराडूनला पाठवण्यात आले आहे.

 
सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330694) अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein: English , Urdu