सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘नशा मुक्त युवा, विकसित भारत प्रश्नमंजूषा’ स्पर्धेत आतापर्यंत 7,597 पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग


प्रश्नमंजूषा स्पर्धेत नागरिकांना 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत भाग घेता येणार

Posted On: 30 OCT 2026 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या ऑनलाइन नशा मुक्त युवा, विकसित भारत प्रश्नमंजूषा (Nasha Mukt Yuva, Viksit Bharat Quiz) स्पर्धेत आतापर्यंत 7,597 पेक्षा जास्त नागरिकांनी भाग घेतला आहे. नागरिकांच्‍या  सहभागाचे प्रमाण वेगाने वाढत असून, यातून या उपक्रमाबद्दल नागरिकांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर  उत्सुकता दिसून येत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 26 ऑक्टोबर 2026 रोजी या प्रश्नमंजूषा स्पर्धेचा प्रारंभ केला होता.

अंमली आणि मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच, अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये विशेषतः तरुणांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी मंत्रालयाच्या वतीने नशा मुक्त भारत या अभियानाअंतर्गत (एनएमबीए) या प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन केले  आहे.

ही प्रश्नमंजूषा स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित केली जात आहे. प्रस्तूत स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली आहे. नागरिक ‘MY Bharat’ या पोर्टलद्वारे या प्रश्नमंजूषा स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

सहभागासाठीचा दुवा :

https://mybharat.gov.in/quizzes/yuva/detail/Url9dlIwCinQVSf8lwPB9w/

नशा मुक्‍तीचे अभियान आतापर्यंत 13.99 कोटी युवा प्रतिनिधी आणि 10.91 कोटी महिलांसह एकूण 35.09 कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचले आहे. देशभरात या अभियानाच्या माध्यमातून होत असलेल्या व्यापक जनजागृतीची आणि ते किती व्यापक पातळीवर पोहोचले आहे याची प्रचिती येते.

या प्रश्नमंजूषा स्पर्धेत 20 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.  सहभागींना 10 मिनिटांत या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र दिले जाते. याशिवाय, स्पर्धा पूर्ण झाल्यावर सहभागींना अचूक उत्तरेही पाहता येतात. यामुळे अंमली आणि मादक पदार्था़वरील नियंत्रण आणि प्रतिबंधाबाबतच्या त्यांच्या ज्ञानात मोठी भरही पडत आहे.

या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून सामुदायिक सहभागाला बळकटी देणे, जबाबदारीने निर्णय घेण्याला प्रोत्साहन देणे तसेच विशेषतः युवा वर्गाला अंमली पदार्थविरोधी मोहिमेत योगदान देण्यासाठी एकत्र आणणे, हे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.

मंत्रालयाच्या वतीने सर्व नागरिकांना, विशेषतः युवा पिढीला, नशा मुक्त युवा, विकसित भारत प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्याचे आणि नशा मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सुवर्णा बेडेकर /तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2330645) अभ्यागत कक्ष : 8