Posted On:
30 OCT 2026 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026
केंद्र सरकारचे सप्टेंबर 2026 अखेरपर्यंतचे मासिक खाते एकत्रित करण्यात आले असून त्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातील ठळक निष्कर्ष खाली नमूद केले आहेत :-
केंद्र सरकारला सप्टेंबर 2026 पर्यंत 18,35,422 कोटी रुपये (एकूण जमा रकमेच्या तुलनेत 2026-27 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 50.3% इतके) प्राप्त झाले आहेत. यात 12,76,088 कोटी रुपये करांद्वारे मिळालेला निव्वळ महसूल (केंद्र सरकारचा निव्वळ हिस्सा) आहे, 4,80,732 कोटी रुपये करेतर महसूल आहे तसेच, 78,602 कोटी रुपये कर्जेतर भांडवली जमा यांचा समावेश आहे. या कालावधीत केंद्र सरकारने करांमधील हिश्शाचे हस्तांतरण म्हणून राज्य सरकारांना 6,99,409 कोटी रुपये वर्ग केले आहेत. हे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत 67,658 कोटी रुपयांनी जास्त आहे.
केंद्र सरकारने एकूण 25,49,835 कोटी रुपये (2026-27 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 47.7% इतका) खर्च केला आहे. यापैकी 18,95,288 कोटी रुपये महसुली खात्यावर, तर 6,54,547 कोटी रुपये भांडवली खात्यावर खर्च झाले आहेत.एकूण महसुली खर्चांपैकी 6,46,010 कोटी रुपये व्याजाची देणी भागवण्यासाठी, तर 2,22,905 कोटी रुपये प्रमुख अनुदानांवर खर्च करण्यात आले आहेत.

सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumba