Posted On:
29 OCT 2026 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2026
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मेरा युवा भारत (MY Bharat) ने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील महाविद्यालये आणि संस्थांमध्ये ‘विकसित भारत युवा संवाद: आपले मत जाणून घ्या’ या कार्यक्रमाच्या 23 सत्रांचे आयोजन केले होते. या सत्रात 5,481 तरुण सहभागी झाले होते. तरुणांमध्ये, विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये, मतदानाविषयी जागरूकता वाढवणे तसेच त्यांना मतदानाचे हक्क, निवडणूक प्रक्रिया आणि नागरी जबाबदाऱ्यांची ओळख करून देऊन लोकशाही प्रक्रियेत माहितीपूर्ण सहभागासाठी प्रोत्साहित करणे हा या सत्रांचा उद्देश आहे.

26 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 500 विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. या देशव्यापी मोहिमेत 29 ऑक्टोबरपर्यंत 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 50 युवा संवाद आयोजित करण्यात आले होते. यात 11,787 युवक आणि 51 युथ आयकॉन्स सहभागी झाले. या सत्रांमध्ये तरुण, लोकप्रतिनिधी आणि युथ आयकॉन्स एकत्र येऊन लोकशाही प्रक्रियेतील सहभाग, नागरीकांच्या जबाबदाऱ्या आणि राष्ट्र उभारणीतील युवकांची भूमिका या विषयांवर चर्चा करतात.

या मोहिमेत निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी 'लोकशाही प्रतिज्ञा’ आणि 'आपले मत ओळखा' (Know Your Vote) या ऑनलाइन प्रश्नमंजुषेचाही समावेश आहे. युवकांच्या सहभागासाठी 'माय भारत' पोर्टलवरील नोंदणी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी क्यूआर-आधारित सूचना संकलन यांसारख्या अतिरिक्त संधी उपलब्ध आहेत.

* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai