संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वास्को बाजारातील मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी भारतीय नौदलाने गोवा अग्निशमन दलाला केले साहाय्य


अग्निशमन कार्याला साहाय्य करण्यासाठी आयएनएस गोमंतक, आयएनएस हंसा आणि नौदल शस्त्रागार डेपोमधून पाच संरक्षण अग्निशमन वाहने तैनात

Posted On: 29 OCT 2026 12:34PM by PIB Mumbai

गोव्यातील वास्को द गामा येथील वास्को बाजारात 28 ऑक्टोबर 2026 रोजी लागलेली मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी भारतीय नौदलाने नागरी प्रशासनाला तात्काळ साहाय्य केले.

स्थानिक प्रशासनाच्या विनंतीनुसार, भारतीय नौदलाने अग्निशमन कार्याला साहाय्य करण्यासाठी आयएनएस गोमंतक, आयएनएस हंसा आणि गोवा नौदल क्षेत्र मुख्यालयाच्या (एचक्यूजीएनए) अखत्यारीतील नौदल शस्त्रागार डेपो (एनएडी) मधून पाच संरक्षण अग्निशमन वाहने (डीएफटी) तैनात केली.

नौदलाच्या अग्निशमन पथकांनी गोवा राज्य अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा यांच्याशी समन्वय साधून काम केले. समन्वित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

या तत्पर प्रतिसादातून आणीबाणी तसेच आपत्ती काळात नागरी प्रशासन आणि स्थानिक प्राधिकरणांना मदत करण्याची भारतीय नौदलाची निरंतर वचनबद्धता दिसून येते. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा नागरी प्राधिकरणांना मदत करण्यास नौदल तत्पर आहे.

***

AshishSangle / ShraddhaMukhedkar / DineshYadav

 

Follow us on Social Media:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 2329993) अभ्यागत कक्ष : 23
Read this releasein: English