Posted On:
27 OCT 2026 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026
केंद्रीकृत रोजगार अधिसूचना (CEN - Centralised Employment Notice) क्रमांक 08/2026 अंतर्गत स्टेशन मास्तर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, याद्वारे भारतीय रेल्वेने पदवीधर उमेदवारांसाठी रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. पात्र उमेदवारांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच, आपल्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे संख्याबळ मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने केले जात असलेले प्रयत्न या भरतीतून दिसून येतात.
रेल्वे भरती प्रक्रियेशी संबंधित हा एक महत्वाचा निर्णय ठरला आहे. याअंतर्गत 2026 पासून स्टेशन मास्तर भरतीची अधिसूचना स्वतंत्रपणे जारी केली जाईल, असे रेल्वे मंडळाने नमूद केले आहे. या समर्पित भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांना या पदासाठीची पात्रता, परीक्षा पद्धती आणि जागांचे वितरण याविषयीची सविस्तर माहिती एकाच अधिसूचनेत उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय रोजगार अधिसूचना 08/2026 अंतर्गत देण्यात आलेल्या रेल्वे भरती मंडळेनिहाय (RRB) जागांच्या वितरणानुसार विविध रेल्वे भरती मंडळे आणि क्षेत्रांमध्ये एकूण 1,265 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या संधी विविध रेल्वे विभागांमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे देशभरातील वेगवेगळ्या भागांतील पदांसाठी स्पर्धा करण्याची संधी पात्र पदवीधरांना मिळणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज सादर करण्यापूर्वी पात्रतेच्या तपशीलवार अटी, जागांचे विवरण आणि अर्जाशी संबंधित सूचना यांचा व्यवस्थित आढावा घ्यावा असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे.
उमेदवार भरतीसंबंधीची तपशीलवार अधिसूचना, पात्रता अटी, परीक्षेचा अभ्यासक्रम, अर्जासंबमधीच्या सूचना आणि रेल्वे भरती मंडळेनिहाय जागांचे वितरण खाली नमूद अधिकृत दुव्यांना भेट देऊन पाहू शकतात:
तपशीलवार अधिसूचना — CEN No. 08/2026, Station Master:
https://rrb.indianrailways.gov.in/-/image/1793016771817CEN_08_2026_StationMaster.pdf/examsDocuments
रेल्वे भरती मंडळांची अधिकृत संकेतस्थळे:
https://rrb.indianrailways.gov.in/
ऑनलाइन अर्जासाठीचे पोर्टल:
https://www.rrbapply.gov.in/
उमेदवारांनी भरतीसंबंधित सर्व अद्ययावत माहिती आणि सूचनांसाठी केवळ रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संवादांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai