Posted On:
25 OCT 2026 12:15PM by PIB Mumbai
एनएलसी इंडिया लिमिटेड ने विशेष मोहीम 6 मध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने सुरू केलेली ही एक देशव्यापी मोहीम असून, ती सर्व केंद्रीय मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये राबवली जात आहे.
15 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत झालेल्या सखोल पूर्वतयारी टप्प्यानंतर—ज्यामध्ये एनएलसीआयएल च्या सर्व युनिट्स, प्रादेशिक कार्यालये आणि संयुक्त उपक्रमांसाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती—सध्या कंपनी अंमलबजावणी टप्प्यात (2 ते 31 ऑक्टोबर 2026) काम करत आहे. विशेष मोहीम 6 अंतर्गत, ई-कचरा व्यवस्थापन नियम 2022 चे पालन करून, ई-कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि पर्यावरणास पूरक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यावर विशेष भर दिला जात आहे. याद्वारे शाश्वत संसाधन व्यवस्थापन आणि उत्कृष्ट कार्यप्रणालीला चालना दिली जात आहे.
विशेष मोहीम 6 अंतर्गत उत्कृष्ट कार्यप्रणाली आणि प्रशासनाप्रती आपली दृढ बांधिलकी दर्शवत, एलएलसीइंडिया लिमिटेडने 23 ऑक्टोबर 2026 पर्यंत अनेक महत्त्वाची कार्यविषयक आणि स्वच्छताविषयक उद्दिष्टे ओलांडली आहेत. कंपनीने आपल्या विविध युनिट्समध्ये प्रभावी अंमलबजावणी करत 180 ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या—जे 145 ठिकाणांच्या मूळ उद्दिष्टापेक्षा अधिक आहे. तसेच, 2,415,786 चौरस फुटांच्या नियोजित लक्ष्यापेक्षा अधिक, म्हणजेच 2,496,193 चौरस फुटांची जागा मोकळी केली आहे. कंपनीने 1,272 मेट्रिक टन भंगार साहित्याची विल्हेवाट लावली, जे 1,266.22 मेट्रिक टनांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. या प्रक्रियेतून कंपनीला 3,11,89,078 रुपयांचा महसूल मिळाला आहे.
|
एनएलसी इंडिया लिमिटेड
|
|
|
Sl. No.
|
Description of Activities
|
Status as on 23.10.2026
|
|
| |
|
Proposed
|
Achieved
|
|
|
|
1
|
23.10.2026रोजीच्या क्रियाकलापांच्या स्थितीचे वर्णन
प्रस्तावित साध्य
|
145
|
180
|
|
|
2
|
उपक्रमात स्वच्छ झालेली जागा चौरस फुटात
|
24,15,786
|
2496193
|
|
|
3
|
विल्हेवाट लावलेले भंगार
मेट्रिक टनामध्ये
|
1266.22
|
1272
|
|
|
4
|
एकूण मिळालेला महसूल रुपयांमध्ये
|
Rs.3,11,89,078/-
|
|
|
5
|
व्यवस्थापन नोंदी
|
एनएलसीआयएल ० विशेष मोहिम 6
|
|
| |
|
Proposed
|
Achieved
|
|
|
|
(i) पाहणी केलेल्या कागदपत्रांच्या फाईली
|
1330
|
1378
|
|
|
|
(ii) पाहणी केलेल्या ई फाईली reviewed
|
295
|
320
|
|
|
|
(iii) निकाली काढण्यात आलेल्या फाईलींची संख्या
|
500
|
506
|
|
|
|
(iv)निकाली काढण्यात आलेल्या ई फाईलींची संख्या
|
90
|
122
|
|
|
|
6
|
सरलीकरणासाठी ओळखल्या गेलेल्या नियम / प्रक्रियेची संख्या 3
|
|
3
|
|
|
7
|
नवीन उपक्रमांची संख्या
|
50
|
26
|
|
|
8
|
प्रलंबित तक्रार
|
|
Nil
|
|
|
9
|
समाजमाधअयमाद्वारे केलेला प्रचार
|
| |
ट्विट्सची संख्या
|
352
|
|
|
|
10
|
अपलोड केलेल्या व्हिडीयोंची संख्या
|
8
|
|
|
11
|
वर्तमान पत्रातील कात्रणांची संख्या
|
6
|
|
| |
|
|
|
|
|
|
|
|
|
नोंदणी व्यवस्थापनामध्ये, एनएलसीआयएल ने 1,378 फिजिकल फाईल्स आणि 320 ई-फाईल्सचे पुनरावलोकन केले, 506 फिजिकल फाइल्स आणि 122 ई-फाईल्स काढून टाकल्या आणि 26 नवीन उपक्रम सुरू करण्यासोबतच प्रशासकीय सुलभीकरणासाठी तीन प्रक्रिया ओळखल्या.
नागरिक सेवेसाठीचे समर्पण अधोरेखित करून, एनएलसीआयएल ने सर्व प्रलंबित सार्वजनिक तक्रारी शून्यावर सोडल्या. 352 सोशल मीडिया पोस्ट्स, 8 व्हिडिओ हायलाइट्स आणि 6 प्रेस कव्हरेज वैशिष्ट्यांसह, डिजिटल आणि पब्लिक आउटरीचद्वारे मोहिमेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला.
एमओसीच्या निर्देशानुसार, 03.10.206 रोजी एनएलसीआयएल येथे ई-कचरा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. एनएलसी इंडिया लिमिटेड ने मोहिमेच्या मोहिमेअंतर्गत तीन वेगवेगळ्या श्रेणींमधील 2,042 ई-कचऱ्याची यशस्वीरित्या साफसफाई केली. जबाबदार इलेक्ट्रॉनिक मालमत्ता व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक करून, कंपनीने माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार उपकरणे च्या 1,491 वस्तू, प्रयोगशाळा उपकरणांच्या 351 युनिट्स आणि ग्राहक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि फोटोव्होल्टेइक पॅनल्स च्या 200 वस्तूंवर प्रक्रिया केली. अप्रचलित इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि तांत्रिक उपकरणे पद्धतशीरपणे काढून टाकून, एनएलसीआयएल त्याच्या संपूर्ण ऑपरेशन्समध्ये इको-फ्रेंडली डिस्पोजल प्रोटोकॉल आणि वर्तुळाकार संसाधन व्यवस्थापन मजबूत करत आहे.
स्पेस मॅनेजमेंट, स्क्रॅप डिस्पोजल, रेकॉर्ड मॅनेजमेंट, सर्वोत्तम पद्धती, वेल्थ टू वेल्थ सुनिश्चित करणे, कामाच्या ठिकाणी परिसर वाढवणे, पर्यावरणपूरक पद्धती, नागरिक केंद्रित उपक्रम आणि ई-कचरा विल्हेवाट लावणे या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करून, एमओसी च्या निर्देशांनुसार एनएलसीआयएलमध्ये विशेष मोहीम 6 परिश्रमपूर्वक राबविण्यात आली.
ई-कचऱ्याचे संकलन, पृथक्करण आणि विल्हेवाट
वरील उपक्रमांसह, एनएलसी इंडिया लिमिटेड, कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत, विशेष मोहीम 6 राबविण्यात आघाडीवर आहे.
***
हर्षल अकुडे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai