माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने नव्याने स्थापित मंडळासोबत घेतली 150 वी बैठक

Posted On: 23 OCT 2026 9:46PM by PIB Mumbai

मुंबई, 23 ऑक्‍टोबर 2026

 

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (सीबीएफसी) 150 व्या बैठकीचे आज आयआयटी मुंबई  येथील रिसर्च पार्कमध्ये आयोजन करण्यात आले. नव्याने स्थापित मंडळाची ही पहिलीच बैठक होती.

ही बैठक सीबीएफसीचे अध्यक्ष  शशी शेखर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला  वामन केंद्रे,  रमेश पतंगे, निशिगंधा वाड,  रूपाली गांगुली, सुप्रिया यारलागड्डा,  प्रियदर्शन,  यतींद्र मिश्र,  विनोद अनुपम,  निला माधब पांडा आणि  पंकज त्रिपाठी हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

प्रसन्नजित चॅटर्जी,  मनोज जोशी आणि  अभिषेक जैन यांनी दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून या मंडळाच्या बैठकीत भाग घेतला.

‘सीबीएफसी’ चे माजी अध्यक्ष  प्रसून जोशी यांनी दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमाद्वारे या बैठकीत सहभागी होऊन नव्याने स्थापित मंडळाच्या सदस्यांशी आपले मोलाचे अनुभव, विचार आणि मार्गदर्शन सामायिक केले, त्‍यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

   

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327743) अभ्यागत कक्ष : 11
Read this releasein: English