पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या एकेरी SL4 पॅरा बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिजित सखूजा याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 22 OCT 2026 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुष एकेरीच्या SL4 पॅरा बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजित सखूजा याचे अभिनंदन केले आहे.

त्याने आपल्या पहिल्याच सहभागात पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर स्थान मिळवणे ही कौतुकास्पद कामगिरी आहे. यातून त्याची प्रतिभा, समर्पण वृत्ती आणि कठोर परिश्रमांची प्रचिती येते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांनी अभिजित सखूजा याला क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

"अभिजित सखूजा याचे आश्वासक पदार्पण!

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या एकेरी SL4 पॅरा बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे  अभिनंदन. त्याने आपल्या पहिल्याच सहभागात पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर स्थान मिळवणे ही कौतुकास्पद कामगिरी आहे. यातून त्याची प्रतिभा, समर्पण वृत्ती आणि कठोर परिश्रमांची प्रचिती येते.

त्याला क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326939) अभ्यागत कक्ष : 7