पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोर आणि सज्जन व्यक्तींच्या अंगी असणारी कृतज्ञता आणि परोपकारी वृत्ती अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

Posted On: 21 OCT 2026 7:50AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून या सुभाषितात नारळाचा वृक्ष आणि थोर व्यक्तींमधील साम्य अधोरेखित केले असून त्यांची आयुष्यभरातील कृतज्ञ वृत्ती आणि निःस्वार्थ सेवा या गुणांवर भाष्य केले आहे

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे.

"प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणाम्।

ददति जलमनल्पास्वादमाजीवितान्तं न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति॥" 

ज्याप्रमाणे नारळाचे झाड आपल्या  सुरुवातीच्या काळात  घेतलेल्या अगदी थोड्या पाण्याचा उपकार आयुष्यभर लक्षात ठेवते, आणि आपल्या डोक्यावर जड ओझे म्हणजेच नारळांचा भार बाळगूनही मानवाला आयुष्यभर गोड पाणी देत राहते; त्याचप्रमाणे सज्जन आणि थोर व्यक्ती आपल्यावर झालेल्या छोट्याशा उपकाराची आठवण विशेषतः ज्या महापुरुषांनी त्याग केला आहे त्यांच्याप्रती आदर बाळगून आयुष्यभर त्यांचे स्मरण करतात आणि कधीही उपकार विसरत नाहीत. ते नेहमीच त्यांच्यासाठी केलेला त्याग,तपश्चर्या आणि समर्पणाबद्दल मनामध्ये अतीव कृतज्ञता बाळगून, आपले जीवन त्यांच्या आदर्शानुसार समर्पित करतात; आणि आपल्या कृतीतून तसेच निःस्वार्थ सेवेच्या भावनेतून त्या परोपकाराप्रती सदैव कृतज्ञ राहतात.

***

NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325767) अभ्यागत कक्ष : 8