पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी केले आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर टी 12/13 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सौम्या यांचे अभिनंदन

Posted On: 19 OCT 2026 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर टी 12/13 प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम वेळेची नोंद करत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सौम्या यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, पदार्पणातच केलेली त्यांची उत्कृष्ट कामगिरी त्यांची प्रतिभा, समर्पण आणि दृढनिश्चय दर्शवते.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पुढील संदेश प्रसिद्ध केला:

“खरोखरच सुवर्णमय पदार्पण!

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर टी 12/13 प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम वेळेची नोंद करत सुवर्णपदक जिंकून सौम्या यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे!

पदार्पणातच अशी उत्कृष्ट कामगिरी करणे हे त्यांची प्रतिभा, समर्पण आणि दृढनिश्चय यांचे द्योतक आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन! : PM @narendramodi”

 

* * *

नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325462) अभ्यागत कक्ष : 13