पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्गा मातेचे आशीर्वाद आणि संरक्षणरूपी कृपा अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

Posted On: 19 OCT 2026 2:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून या सुभाषितात असे म्हटले आहे की जे भाविक भक्तिमय अंतःकरणाने दुर्गा मातेचे स्मरण करतात त्यांची प्रगती होते आणि त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते. देवीची ध्यानधारणा मनापासून करणाऱ्या सर्व भाविकांचे माता प्रत्येक संकटातून रक्षण करते, हे या श्लोकातून अधोरेखित होते. 

पंतप्रधानांनी हे संस्कृत सुभाषित सामायिक करुन एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते।

ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः॥”

 

* * *

आशिष सांगळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325073) अभ्यागत कक्ष : 12