अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

स्वच्छता आणि सुशासन संस्थात्मक करण्यासाठी अणुऊर्जा विभागाने हाती घेतली 'विशेष मोहीम 6'

Posted On: 16 OCT 2026 9:11PM by PIB Mumbai

मुंबई, 16 ऑक्‍टोबर 2026

 

अणुऊर्जा विभागाने  स्वच्छता संस्थात्मक करण्यासाठी, प्रलंबित कामाचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी आणि सुशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान राबवण्यात आलेला 'विशेष मोहीम 6' च्या पूर्वतयारीचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा विस्तार करत, विभागांतर्गत येणाऱ्या सर्व घटक घटकांनी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी आणि अनुदानित संस्थांनी या मोहिमेसाठी आपली मुलभूत उद्दिष्टे निश्चित केली आहेत. विभाग आता 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान या मोहिमेचा मुख्य टप्पा राबवत असून, यातील दैनंदिन प्रगतीचा आढावा SCDPM पोर्टलद्वारे घेतला जात आहे.

पूर्वतयारीच्या टप्प्यात प्रकल्पस्थळ निश्चित करणे, प्रलंबित संदर्भ लक्षात घेणे आणि ई-सामग्रीचे  वर्गीकरण करणे यांसाठी सविस्तर प्राथमिक काम करण्यात आले. तीव्र स्वच्छता मोहीम आणि जागेचा सुयोग्य वापर  यासाठी विविध आस्थापनांमध्ये एकूण 312 जागांची निवड करण्यात आली आहे. प्रलंबित कामे आणि तक्रार निवारणाअंतर्गत, या मोहिमेत खासदारांचे 5 संदर्भ, 2 आंतर-मंत्रालयीन कॅबिनेट  प्रस्ताव, CPGRAMS वर नोंदवलेल्या 47 सार्वजनिक तक्रारी, 42 संसदीय आश्वासने, राज्य सरकारचा 1 संदर्भ, पंतप्रधान कार्यालयाचे 5 संदर्भ, 26 सार्वजनिक तक्रार अर्ज आणि नियम व प्रक्रिया सोप्या करण्याशी संबंधित 25 बाबींचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अभिलेख व्यवस्थापनाचा  भाग म्हणून, कार्यक्षम आर्काइव्हिंग, प्रलंबित कामे कमी करणे आणि कार्यालयातील जागेचा सुयोग्य वापर सुलभ करण्यासाठी विभागाने 14,003  प्रत्यक्ष कागदोपत्री फाइल्स आणि 3,408 ई-फाइल्सचे पद्धतशीर पुनरावलोकन करण्याचे नियोजित केले आहे. उत्तम अभिलेख व्यवस्थापन सुनिश्चित करणे आणि अणुऊर्जा विभागाच्या सर्व आस्थापनांमध्ये अधिक स्वच्छ व सुटसुटीत कामाचे वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या मोहिमेत ई-कचऱ्याच्या शास्त्रीय व्यवस्थापनावरही विशेष भर देण्यात आला असून, 4,038 कालबाह्य उपकरणांचा टप्प्याटप्प्याने निपटारा, पुनरुपरोग आणि नूतनीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार उपकरणांचे 2,951 युनिट्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि फोटोव्होल्टेइक पॅनेलचे 383 युनिट्स, मोठी आणि लहान इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे 335 युनिट्स, 2 इलेक्ट्रॉनिक साधने, 295 प्रयोगशाळा उपकरणे आणि इतर उपकरणांचे 75 युनिट्स समाविष्ट आहेत. लागू असलेल्या राष्ट्रीय ई-कचरा व्यवस्थापन नियमांनुसार सुरक्षित व योग्य विल्हेवाटीसोबतच, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मालमत्तेचा पुनर्वापर, दुरुस्ती, नूतनीकरण आणि आयुष्यमान वाढवण्याला या उपक्रमात प्राधान्य दिले जात आहे.

'विशेष मोहीम 6' चा शास्त्रीय ई-कचरा व्यवस्थापन, प्रलंबित कामांचा निपटारा आणि महसूल निर्मितीसह जागेचा सुयोग्य वापर या तीन मुख्य उद्दिष्टांवर भर आहे. सार्वजनिक तक्रारी, संसदीय आश्वासने आणि शासकीय संदर्भांचे वेळेवर निवारण करून, विभाग प्रशासकीय प्रतिसादक्षमता आणि जबाबदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी, अभिलेख व्यवस्थापन, भंगार विल्हेवाट आणि उपलब्ध जागेचा प्रभावी वापर यामुळे स्वच्छ कार्यस्थळे निर्माण होण्यास आणि महसूल मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

विशेष मोहीम 6' द्वारे, अणुऊर्जा विभाग स्वच्छता संस्थात्मक करण्यासाठी, कार्यक्षम संसाधन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सार्वजनिक सेवा वितरणात उत्तरदायित्व व उत्कृष्टतेला बळकटी देण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324583) अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein: English