आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एम्स नागपूर चमकले, जगातील अव्वल 2% शास्त्रज्ञांच्या 2026 च्या यादीत तीन प्राध्यापकांचा समावेश

Posted On: 15 OCT 2026 11:49AM by PIB Mumbai

नागपूर, 15 ऑक्टोबर 2026

एम्स नागपूरसाठी एक अभिमानाचा क्षण आला असून त्यांच्या तीन प्रतिष्ठित प्राध्यापक, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत पी. जोशी; अतिरिक्त प्राध्यापक डॉ. जया प्रसाद त्रिपाठी; आणि समुदाय वैद्यक विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. अरविंद पी. गांधी, यांचा प्रतिष्ठित जगातील अव्वल 2% शास्त्रज्ञांच्या 2026 च्या यादीत समावेश झाला आहे. ही यादी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने एल्सेव्हियरच्या स्कोपस डेटाबेसमधील संशोधन संदर्भ डेटा वापरून संकलित केली जाते.

अपडेटेड सायन्स-वाइड ऑथर डेटाबेसेस ऑफ स्टँडर्डाइज्ड सायटेशन इंडिकेटर्स या नावाने औपचारिकपणे ओळखली जाणारी ही यादी, विविध वैज्ञानिक शाखांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव असलेल्या संशोधकांना मान्यता देते. यामध्ये एकूण संदर्भ, एच-इंडेक्स, सह-लेखकत्व-समायोजित मेट्रिक्स आणि एक संमिश्र संदर्भ स्कोअर यांसारख्या अनेक ग्रंथमापन निर्देशकांचा वापर केला जातो. हा डेटाबेस त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील संशोधन प्रभाव आणि एका अलीकडील वर्षातील संशोधनाचा प्रभाव या दोन्हींचे मूल्यांकन सादर करतो.

या तीन प्राध्यापकांचा समावेश हा त्यांच्या संशोधन योगदानाची एक महत्त्वपूर्ण ओळख आहे आणि तो वैज्ञानिक अन्वेषण, शैक्षणिक उत्कृष्टता व पुरावा-आधारित आरोग्यसेवा यांना पुढे नेण्याच्या एम्स नागपूरच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. त्यांचे हे यश संस्थेचे प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण सामाजिक प्रभाव निर्माण करणारे उच्च-गुणवत्तेचे संशोधन करण्यासाठी प्रेरणा देते.

एम्स नागपूर या तीन शास्त्रज्ञांचे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन करत आणि त्यांना वैज्ञानिक संशोधन व आरोग्यसेवा पुढे नेण्यात निरंतर यशासाठी शुभेच्छा देत आहे.

***

NitinFulluke / ShaileshPatil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2323719) अभ्यागत कक्ष : 26
Read this releasein: English