संरक्षण मंत्रालय
'इंद्रा-2026’ या द्विपक्षीय सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘सह्याद्री’ हे जहाज रशियातील व्लादिवोस्तोक येथे दाखल
Posted On:
11 OCT 2026 3:12PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाचे ‘सह्याद्री’ हे जहाज 10 ऑक्टोबर 2026 रोजी रशियातील व्लादिवोस्तोक येथे दाखल झाले.
भारतीय नौदल आणि रशियन महासंघाचे नौदल यांच्यात 13 ते 18 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय सराव 'इंद्रा 2026' मध्ये हे जहाज सहभागी होत आहे. या तैनातीमुळे दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये व्यावसायिक सहभाग आणि कार्यात्मक परस्परसंवादाची संधी उपलब्ध होऊन सागरी सहकार्य आणि आंतरकार्यक्षमता वाढेल.
आयएनएस सह्याद्रीचा सहभाग हा भारत सरकारच्या 'महासागर' (सर्व प्रदेशांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती) या संकल्पनेशी सुसंगत आहे. हा सराव भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण आणि सागरी भागीदारीला अधिक दृढ करतो. या तैनातीमुळे 4 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेदरम्यान निर्माण झालेली गती पुढे नेण्याची संधी देखील मिळेल.
'इंद्रा 2026' या सरावाच्या समुद्रकिनारी होणाऱ्या सरावाच्या टप्प्यादरम्यानच्या कार्यक्रमांचा आणि त्यानंतर समुद्रातील समन्वित परिचालन कार्यांचा समावेश असेल. या सरावामध्ये सहभागी नौदलांमधील परस्पर सामंजस्य, परिचालन समन्वय आणि आंतरकार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने विविध व्यावसायिक संवाद आणि सागरी सरावाचा समावेश असेल.
सरावात्मक कार्यक्रमांव्यतिरिक्त, सामाजिक आणि सांस्कृतिक संवादामुळे दोन्ही नौदलांच्या कर्मचाऱ्यांना एकमेकांशी संवाद साधण्याची तसेच सौहार्द आणि लोकांमधील संबंध दृढ करण्याची संधी मिळेल.
(1)_20261011151248_1a336a.jpeg)
(1)_20261011151257_aa4d3e.jpeg)
(1)_20261011151307_b0a541.jpeg)
(1)_20261011151319_9f2486.jpeg)
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322013)
अभ्यागत कक्ष : 10