अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

टाटा मेमोरियल सेंटर, एसीटीआरईसी द्वारे ‘जुग जुग जियो अभियान’अंतर्गत अवयवदानाबाबत जनजागृती सत्राचे आयोजन

Posted On: 08 OCT 2026 8:41PM by PIB Mumbai

मुंबई, 8 ऑक्टोबर 2026

केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत कार्यरत 'टाटा मेमोरियल सेंटर, एसीटीआरईसी (ACTREC), या खारघर येथील स्वायत्त संस्थेने 6 ऑक्टोबर 2026 रोजी 'जुग जुग जियो अभियान' अंतर्गत अवयवदानाबाबत जनजागृती सत्राचे आयोजन केले. हे सत्र 'प्रादेशिक अवयव आणि उती प्रत्यारोपण संस्था' (ROTTO-SOTTO - पश्चिम विभाग) आणि मुंबईतील केईएम रुग्णालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.

कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये अवयव व उती दानाचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि अवयवदानाबाबत माहितीपूर्ण व जबाबदार चर्चांना प्रोत्साहन देण्याच्या  उद्देशाने या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

केईएम रुग्णालयातील 'ROTTO-SOTTO' (पश्चिम विभाग) येथील 'IEC' सल्लागार डॉ. मनीषा जाधव यांनी अवयवदानाशी संबंधित विविध पैलूंवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सत्रात अवयवदानाचे महत्त्व व प्रक्रिया, त्याबाबतचे सर्वसाधारण गैरसमज व वस्तुस्थिती, संमतीशी संबंधित बाबी, तसेच भारतातील अवयवदान आणि प्रत्यारोपणाशी संबंधित कायदेशीर व नियामक तरतुदी या विषयांचा समावेश होता.

यावेळी प्रश्नोत्तरांचे एक संवादात्मक  सत्रही आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये  उपस्थितांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची आणि अवयवदानाचे व्यावहारिक व कायदेशीर पैलू अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळाली.

हे सत्र एसीटीआरईसी मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले; यामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी कमला पैडीपती, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत के. रेड्डी, डॉ. सुमेधा पाटणकर, डॉ. प्रीती मालगावकर व डॉ. भारती वीर (नर्सिंग अधीक्षक) तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात  एसीटीआरईसी संस्थेने  सक्रिय सहभाग नोंदवला आणि सहभागींना अवयवदानाचे महत्त्व तसेच अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेशी संबंधित कायदेशीर तरतुदींविषयी माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.

या उपक्रमाने अवयवदानाबद्दल जागरूकता वाढवण्याचे आणि लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले, जेणेकरून अवयव आणि उती  प्रत्यारोपणाद्वारे जीवन वाचवण्याच्या आणि सुधारण्याच्या व्यापक ध्येयाला हातभार लागेल.

टाटा मेमोरियल सेंटर, ACTREC ने केईएम रुग्णालयातील 'ROTTO-SOTTO'  पश्चिम विभागीय टीम आणि डॉ. मनीषा जाधव यांची  या जागरूकता उपक्रमातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्रशंसा केली.  आरोग्यविषयक जागरूकता आणि समुदाय-केंद्रित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या टाटा मेमोरियल सेंटर, ACTREC च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पीआयबी मुंबई |निलिमा चितळे/सुषमा काणे /प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2321028) अभ्यागत कक्ष : 5
Read this releasein: English