दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
प्रादेशिक स्तरावरील डाक अदालतीचे 15 ऑक्टोबर रोजी पणजी येथे आयोजन
Posted On:
07 OCT 2026 7:30PM by PIB Mumbai
पणजी, 7 ऑक्टोबर 2026
टपाल विभागातर्फे,प्रादेशिक स्तरावरील डाक अदालत गोव्यातील पणजी येथे 15 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता पोस्टमास्टर जनरल, पणजी यांच्या कार्यालयात आयोजित केली जाणार आहे.
या डाक अदालतीच्या वेळी ग्राहकांना टपाल सेवेशी संबंधित प्रलंबित तक्रारी मांडण्याची आणि त्यांच्या त्वरित निवारणाची मागणी करण्याची संधी उपलब्ध असेल. सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिलेल्या तक्रारींचा यादरम्यान विचार केला जाईल.
टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक आणि मनी ऑर्डरचे पैसे न मिळणे यासंबंधीच्या तक्रारी या डाक अदालतीच्या दरम्यान घेतल्या जाऊ शकतात.
ज्या ग्राहकांना आपल्या तक्रारी सादर करायच्या आहेत, त्यांनी आपल्या तक्रारी दोन प्रतींमध्ये सहाय्यक संचालक, टपाल सेवा-1, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा विभाग, पणजी – 403001 या पत्त्यावर पाठवाव्यात.
तक्रारीमध्ये मूळ तक्रारीची तारीख आणि ज्या अधिकाऱ्यांना ती उद्देशून केली होती त्यांची नावे व पदनामे यांसह संबंधित तपशील स्पष्टपणे नमूद केलेला असावा. तक्रारीची तपासणी सुलभ व्हावी यासाठी, उपलब्ध असल्यास, सहाय्यक कागदपत्रे देखील जोडलेली असावीत.
तक्रारी स्वीकारण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर, 2026 आहे.
टपाल विभागाच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि टपाल सेवांच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी एक तक्रार निवारण यंत्रणा म्हणून वेळोवेळी डाक अदालतींचे आयोजन केले जात असते.

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320353)
अभ्यागत कक्ष : 7