अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस)च्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मानखुर्द येथील केंद्रीय विद्यालयात युवा विद्यार्थ्यांसाठी वस्तु आणि सेवा करासंबंधित जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 07 OCT 2026 7:19PM by PIB Mumbai

मुंबई, 7 ऑक्टोबर, 2026

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या’ अंतर्गत असलेल्या ‘करदाता सेवा महासंचालनालयाच्या (DGTS) मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने, 7 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील मानखुर्द येथील 'पीएम श्री केंद्रीय विद्यालयात’ "तरुण मनांसाठी जीएसटी: दैनंदिन जीवनातील कर आकारणी समजून घेणे"  या विषयावर एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  वस्तू आणि सेवा कर (GST), दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व आणि कर प्रणालीमध्ये जबाबदार नागरिकांची भूमिका यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

डीजीटीएस (DGTS) च्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी आपल्या बीजभाषणात तरुणांमध्ये करांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्व अधोरेखित केले. वस्तु आणि सेवा कराची मूलभूत वैशिष्ट्ये, विविध अप्रत्यक्ष करांना एकाच प्रणालीखाली आणण्यातील भूमिका आणि खरेदी करताना योग्य कर-पावती (tax invoice) घेण्याचे महत्त्व त्यांनी विषद करून सांगितले.  तसेच, करातून मिळणारा महसूल सार्वजनिक सेवा आणि पायाभूत सुविधांना कसा हातभार लावतो, हे देखील त्यांनी समजावून सांगितले.

मानखुर्दच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य पवन खंडाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांमध्ये करविषयक जागरूकता आणि  आर्थिक साक्षरतेचे महत्व पटवून दिले.


सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2320347) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English