पंतप्रधान कार्यालय
शिक्षण,सांघिक कृती आणि शासनातील कठोर परिश्रम अधोरेखित करणारा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
07 OCT 2026 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रारंभिक काळात अनेक गोष्टी शिकून घेणे, सांघिक कार्य आणि कठोर परिश्रम यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कसा प्रबळ भर होता, हे अधोरेखित करणारा हसमुख अधिया यांचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे.
या त्यांच्या दृष्टिकोनामुळे शासनाला एक नवी दृष्टी मिळाली आणि 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात दिसून आलेल्या परिवर्तनवादी नेतृत्वाचा पाया घातला गेला, यावर अधिया यांनी प्रकाश टाकला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्सवर पोस्ट केले आहे :
“गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतानाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रारंभिक काळात अनेक गोष्टी शिकून घेणे, सांघिक कार्य आणि कठोर परिश्रम यावर त्यांचा प्रबळ भर दिसून येत असे. या दृष्टिकोनामुळे शासनाला एक नवीन दृष्टी मिळाली आणि त्यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील नेतृत्वाला आकार मिळाला, अशी त्यांची आठवण हसमुख अधिया यांनी सांगितली आहे.
https://www.hindustantimes.com/india-news/a-glimpse-at-early-years-of-narendra-modi-as-the-chief-minister-of-gujarat-101791334808987.html
नमो ॲप वरून
सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmum
(Release ID: 2320255)
अभ्यागत कक्ष : 7