पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाला आकार देणाऱ्या उद्योग, उद्योजकता आणि उत्पादन क्षेत्रासाठी निर्माण झालेले पोषक वातावरण अधोरेखित करणारा लेख सामायिक केला
Posted On:
07 OCT 2026 4:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उदय कोटक यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. या लेखात पंतप्रधानांच्या 25 वर्षांच्या नेतृत्वकाळामुळे भारतातील उद्योग, उद्योजकता आणि उत्पादन क्षेत्रासाठीचे वातावरण अधिक सक्षम होण्यास कशी मदत झाली, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
सुधारणा, पायाभूत सुविधा आणि उत्पादकता, सेमी कंडक्टर्स, संरक्षण आणि डीप तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन उपक्रमांमुळे कशाप्रकारे भारताच्या औद्योगिक क्षमतांना सामर्थ्य मिळत आहे आणि त्याचबरोबर विकसित भारताच्या संकल्पनेमुळे भारतीय उद्योगांचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, हे कोटक यांनी या लेखात अधोरेखित केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या नेतृत्त्वकाळाने भारतातील उद्योग, उद्योजकता आणि उत्पादन क्षेत्रासाठीचे वातावरण अधिक सक्षम होण्यास मदत झाल्याचे उदय कोटक यांनी लिहिले आहे. उत्पादन, सेमीकंडक्टर्स, संरक्षण आणि डीप तंत्रज्ञान या क्षेत्रांतील सुधारणा, पायाभूत सुविधा आणि नवीन उपक्रम औद्योगिक क्षमतांना नवी चालना देत आहेत.
विकसित भारताची उभारणी भारतीय उद्योगांना अधिक प्रगती करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. भारताच्या पुढील टप्प्यातील औद्योगिक विकासासाठी एक विचारपूर्ण दृष्टिकोन यातून दिसून येत आहे.
आशिष सांगळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320190)
अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam