पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अलीकडेच विचारसरणीत लक्षणीय परिवर्तनामुळे झालेला विकासाचा प्रवास अधोरेखित करणारा लेख सामायिक केला

Posted On: 07 OCT 2026 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेंकय्या नायडू यांनी लिहिलेला एक लेख आज सामायिक केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली झालेला भारताचा विकास हा विचारसरणीत झालेल्या परिवर्तनाचे प्रतीक आहे, हे या लेखात अधोरेखित केले आहे. पूर्वापार चालत आलेल्या 'चलता हैं' अर्थात सर्व काही चालते या दृष्टिकोनातून बाहेर पडून परिवर्तनाच्या प्रभावशाली विचारांचे सामर्थ्य दर्शवणाऱ्या 'बदल सकता हैं' म्हणजेच बदल घडवून आणता येतो या शक्यतेवरील दृढ विश्वासाची भावना देशात निर्माण झाल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे.

हा बदल प्रशासन आणि विकासाच्या कित्येक क्षेत्रांमध्ये दिसून येतो आहे. बँकिंग क्षेत्रांमधील सुधारणा, डिजिटल पेमेंट्स प्रणालीचा जलदगतीने झालेला विस्तार आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या दिशेने झालेले प्रयत्न यांमधून दीर्घ काळ रखडलेल्या आव्हानांचे शाश्वत आणि दृढ निर्धाराने केलेल्या कृतीतून निराकरण करता येते.  

पंतप्रधानांनी X समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवासाने भारताला 'चलता हैं' या दृष्टिकोनातून बाहेर पडून 'बदल सकता हैं' ही विचारसरणी आत्मसात करण्यात मदत केली, असे माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी लिहिले आहे.  बँकिंग क्षेत्रातील सुधारणांपासून डिजिटल पेमेंट्स आणि दारिद्र्य निर्मूलनापर्यंत, एकेकाळी  कठीण वाटणाऱ्या आव्हानांना दृढनिश्चयाने सामोरे जात त्यावर मात करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.

विकसित भारताच्या दिशेने भारताच्या वाटचालीला आकार देणाऱ्या बदललेल्या मानसिकतेवर आधारित हा लेख आवर्जून वाचावा.

https://indianexpress.com/article/opinion/columns/from-chalta-hai-to-badal-sakta-hai-changing-the-way-india-thinks-10909840/


आशिष सांगळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 


(Release ID: 2320139) अभ्यागत कक्ष : 11