संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने एअर मार्शल आशुतोष दीक्षित, पीव्हीएसएम, एव्हीएसएम , व्हीएम , व्हीएसएम यांची 'हवाई दल प्रमुख ' (CAS) म्हणून नियुक्ती केली

Posted On: 06 OCT 2026 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

केंद्र सरकारने ' हवाई दल उपप्रमुख ' म्हणून कार्यरत असलेले एअर मार्शल आशुतोष दीक्षित ,पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम , व्हीएसएम यांची, 31, ऑक्टोबर 2026 पासून 'एअर चीफ मार्शल' या पदावर 'हवाई दल प्रमुख' म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान 'हवाई दल प्रमुख' अमर प्रीत सिंग हे 31,ऑक्टोबर 2026  रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

 

09, डिसेंबर 1966 रोजी जन्मलेले एअर मार्शल आशुतोष दीक्षित 6 डिसेंबर 1986  रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान विभागात रुजू झाले. 'हवाई दल उपप्रमुख ' म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, एअर मार्शल दीक्षित यांनी 'हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ' (HQ IDS) येथे 'चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ टू द चेअरमन, चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी' (CISC) आणि 'सेंट्रल एअर कमांड'चे 'एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' म्हणून काम पाहिले आहे.

एअर मार्शल दीक्षित नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स स्टाफ सर्व्हिस कॉलेज (बांगलादेश) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना मिराज-2000, मिगची विविध विमाने, किरण, जॅग्वार, आयएल-78 , हॉक आणि तेजस यांसारख्या विविध विमानांवर 3500 तासांहून अधिक काळ उड्डाण करण्याचा व्यापक अनुभव आहे. ते 'एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट' आणि 'क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर' आहेत. सुमारे चार दशकांच्या आपल्या सेवाकाळात, त्यांनी 'ऑपरेशन-स्टेटेड सागर', 'ऑपरेशन-रक्षक' आणि 'ऑपरेशन सिंदूर' यांसारख्या अनेक मोहिमांमध्ये आणि सराव-सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, एअर मार्शल यांनी अनेक महत्त्वपूर्ण फील्ड आणि स्टाफ पदे भूषवली आहेत. त्यांनी पश्चिम क्षेत्रातील एका आघाडीच्या फायटर एअर बेसचे आणि दक्षिण क्षेत्रातील एका प्रमुख फायटर प्रशिक्षण तळाचे नेतृत्व केले आहे. विविध भूमिकांमधील या एअर ऑफिसरच्या योगदानामुळे भारतीय हवाई दलाच्या परिचालन  क्षमतेत वाढ झाली आहे. त्यांच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन त्यांना 2006  मध्ये 'वायु सेना पदक', 2011  मध्ये 'विशिष्ट सेवा पदक', 2023 मध्ये 'अति विशिष्ट सेवा पदक' आणि 2026  मध्ये 'परम विशिष्ट सेवा पदक' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319813) अभ्यागत कक्ष : 12