पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत, तिरंदाजीमध्ये वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल  कुमकुम अनिल मोहोडचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 03 OCT 2026 5:36PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 3  ऑक्टोबर 2026

2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी स्पर्धेतील  वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुमकुम अनिल मोहोडचे अभिनंदन केले आहे.

निर्णायक 'शूट-ऑफ'मध्ये तिने राखलेला संयम विशेष उल्लेखनीय होता, असे पंतप्रधान म्हणाले.

कुमकुम अनिल मोहोडला सातत्यपूर्ण यशासाठी आणि पुढील वाटचालीसाठी पंतप्रधान मोदींनी तिला शुभेच्छा दिल्या.

‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणाले :

“एक असे सुवर्णपदक जे नेहमीच स्मरणात राहील.

2026  च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 'वैयक्तिक रिकर्व्ह ' प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरल्याबद्दल कुमकुम अनिल मोहोड हिचे अभिनंदन. निर्णायक 'शूट-ऑफ'मधील तिने दाखवलेला संयम विशेष उल्लेखनीय होता. तिला उत्तरोत्तर असेच यश मिळत राहो ! तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi

***

सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318699) अभ्यागत कक्ष : 8