पंतप्रधान कार्यालय
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली, स्वदेशीला प्रोत्साहन देण्याचे केले आवाहन
Posted On:
02 OCT 2026 9:08AM by PIB Mumbai
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी यांचे विचार संपूर्ण जगासाठी प्रेरणादायक असून त्यांचा प्रवाह मानवतेशी जोडलेला असल्याने, ते सदैव प्रासंगिक राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
स्वदेशीच्या, विशेषतः खादीच्या स्वीकारावर, महात्मा गांधी यांनी भर दिला होता, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.
लोकांनी 2 ऑक्टोबरला, किमान एक तरी खादीचे वस्त्र विकत घ्यावे आणि स्वदेशीचा वापर करण्याचा अभिमान बाळगावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. बापूंचा कालातीत संदेश आणि विचार, समाजाला कायम, एक चांगला समाज आणि विकसित भारत म्हणून घडवण्यासाठी पुढेही मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणतात;
“बापूंचा कालातीत संदेश, आपल्याला एक चांगला समाज म्हणून घडण्यास आणि विकसित भारत घडवण्यात कायम मार्गदर्शक ठरो.”
#GandhiJayanti
***
शिल्पा पोफळे/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2318070)
अभ्यागत कक्ष : 18