पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळवल्याबद्दल गुलवीर सिंग यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 25 SEP 2026 9:15PM by PIB Mumbai

 

ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंग यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले असून  यापूर्वी या स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर आता पुन्हा पदक मिळवून त्यांनी देशाची मान पुनश्च अभिमानाने उंचावली असल्याचेही नमूद केले.

पंतप्रधानांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत, त्यांची चिकाटी आणि प्रगती पूर्ण भारतभरातील लांब पल्ल्याच्या शर्यतीचा सराव करणाऱ्या तरुण धावपटूंसाठी प्रेरक असल्याचेही म्हटले.

'एक्स' समाज माध्यमावरील पंतप्रधान कार्यालयाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे:

आधी कांस्य आणि आता आयची-नागोया येथे रौप्यपदक! आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पोडियमवर गुलवीर सिंग यांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यात सातत्य कायम ठेवले आहे!

पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांची चिकाटी आणि त्यांनी केलेली प्रगती संपूर्ण भारतातील युवा  लांब पल्ल्याच्या धावपटूंना प्रेरणा देईल: पंतप्रधान @narendramodi

***

निलिमा चितळे/मंजिरी गानू/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2315199) अभ्यागत कक्ष : 15