पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
24 SEP 2026 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे अभिनंदन केले आहे.
या पदकातून खेळाडूंची निष्ठा आणि कठोर परिश्रमांची प्रचिती येते असे त्यांना म्हटले आहे. संपूर्ण संघाने या स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्याचा दखलपूर्ण उल्लेखही पंतप्रधानांनी केला आहे. यासोबतच पंतप्रधानांनी खेळाडूंना आगामी सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
"आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल आपल्या पुरुष बॅडमिंटन संघाचे अभिनंदन !
या पदकातून खेळाडूंची निष्ठा आणि कठोर परिश्रमांची प्रचिती येते. संपूर्ण संघाने स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
त्यांना आगामी सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा: PM @narendramodi"
* * *
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314604)
अभ्यागत कक्ष : 8