पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडास्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुद्राक्ष बाळासाहेब पाटील याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 21 SEP 2026 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026

आशियाई क्रीडास्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुद्राक्ष बाळासाहेब पाटील याचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले की, संपूर्ण स्पर्धेत त्याची एकाग्रता आणि शिस्त कौतुकास्पद होती, असे मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी यांनी एक्स वर पोस्ट केले:

"आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुद्राक्ष बाळासाहेब पाटील याचे अभिनंदन! संपूर्ण स्पर्धेत त्याची एकाग्रता आणि शिस्त कौतुकास्पद होती. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi"


राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313236) अभ्यागत कक्ष : 7