संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्रालयाने T-72 आणि T-90 रणगाड्यांसाठी 'ऑक्सिलरी पॉवर युनिट्स' (APUs) खरेदी करण्यासाठी 586 कोटी रुपयांचा करार केला

Posted On: 21 SEP 2026 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026

संरक्षण मंत्रालयाने T-72 आणि T-90 रणगाड्यांसाठी 'ऑक्सिलरी पॉवर युनिट्स' (APUs) म्हणजे पूरक ऊर्जा साहित्याची खरेदी करण्याकरिता 'अक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड'सोबत 586 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्लीत, 21 सप्टेंबर 2026 रोजी,  संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

एपीयू (APU) हा रणगाड्याच्या आग नियंत्रण प्रणाली  (फायर कंट्रोल सिस्टम), फायरिंग सर्किट, गन स्टॅबिलायझेशन सिस्टम आणि इतर पूरक यंत्रणांसाठी विद्युत ऊर्जा निर्माण करणारा एक पर्यायी स्रोत आहे. स्वदेशी बनावटीच्या एपीयूचा समावेश केल्यामुळे भारतीय लष्कराच्या 'मेकनाइज्ड फॉर्मेशन्स'ची अर्थात आधुनिक युद्धसाधनांनी सुसज्ज असलेल्या उपकरणांची कार्यान्वित सज्जता, विश्वासार्हता आणि शाश्वतता आणि  टिकाऊपणा अधिक मजबूत असेल, अशी अपेक्षा आहे.

ही खरेदी संरक्षणात्मक चिलखत असलेल्या लष्करी वाहनांच्या अर्थात आर्मर्ड प्लॅटफॉर्मच्या महत्त्वपूर्ण उप-प्रणालींच्या स्वदेशीकरणाच्या दिशेने उचलण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असून ते, उद्योग-प्रणीत  संशोधन आणि विकास (मेक-II) दर्शवते. तसेच यातून स्थानिक अथवा स्वदेशी नवोन्मेषाचे उत्पादनात आणि सेवेतील समावेशनात रूपांतर करण्यातील यंत्रणेचा प्रभावीपणा  दिसून येतो.

हा करार, सरकारच्या 'विकसित भारत @2047' या संकल्पनेशी सुसंगत असून, संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भरता' साध्य करण्याच्या तसेच एक सक्षम, स्वावलंबी व जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम भारतीय संरक्षण उद्योग उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.


राधिका अघोर/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313162) अभ्यागत कक्ष : 9