रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने दिली सोलापूर विभागातील 7 स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी 209 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी
Posted On:
19 SEP 2026 4:15PM by PIB Mumbai
भारतीय रेल्वेने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सात स्थानकांवर एकूण 209 कोटी रुपयांच्या खर्चाने इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवण्यास मंजुरी दिली आहे.
या मंजूर कामांमध्ये हाय डेन्सिटी नेटवर्क असलेल्या 7 मार्गावरील मोहोळ, मुंडेवाडी, बाळे, सोलापूर, होतगी जंक्शन-होतगी ए केबिन, शहाबाद आणि वाडी जंक्शन येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवण्याचा समावेश आहे, जिथे कवच, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग आणि केंद्रीकृत वाहतूक नियंत्रण कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
ही आधुनिक सिग्नलिंग प्रणाली विभागातील रेल्वे सिग्नलिंग पायाभूत सुविधांना बळकट करेल आणि स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली असलेल्या 'कवच'च्या अंमलबजावणीस मदत करेल.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही एक आधुनिक संगणक-आधारित सिग्नलिंग प्रणाली आहे, जी पारंपरिक रिले-आधारित इंटरलॉकिंगची जागा घेते. यामुळे पॉइंट्स आणि सिग्नल्सवर अधिक विश्वसनीय नियंत्रण मिळते, दोष जलद शोधून ते दुरुस्त करणे शक्य होते, देखभाल करणे सोपे होते आणि रेल्वेचे संचालन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होते.
हा प्रकल्प, सिग्नलिंग पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे, रेल्वे सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि जास्त वर्दळीच्या मार्गांवरील परिचालन कार्यक्षमता सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे.
***
माधुरी पांगे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2312447)
अभ्यागत कक्ष : 68