वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑगस्ट 2026 मध्ये भारताची वस्त्रोद्योग निर्यात 16.1% वाढून ₹29,776 कोटींवर पोहोचली

Posted On: 17 SEP 2026 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राने ऑगस्ट 2026 मध्ये निर्यातीमध्ये दमदार वाढ नोंदवली. एकूण निर्यातीत 16.1% ची वार्षिक वाढ होऊन ती ₹29,776 कोटींवर पोहोचली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये ही निर्यात ₹25,656 कोटी होती. एप्रिल–ऑगस्ट 2026 या कालावधीत वस्त्रोद्योगाची एकूण निर्यात ₹1.43 लाख कोटींवर पोहोचली असून, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात 10.3% वाढ नोंदवण्यात आली.

वस्त्रोद्योगातील अनेक प्रमुख विभागांमध्ये व्यापक प्रमाणात वाढ झाली आहे. ऑगस्ट 2026 मध्ये सूत, कापड, तयार वस्तू आणि हातमाग उत्पादनांच्या निर्यातीत 24.1% वाढ झाली, तर मानवनिर्मित सूत, कापड आणि तयार वस्तूंच्या निर्यातीत 19.9% वाढ झाली. गालिच्यांच्या निर्यातीत 15.0% वाढ नोंदवण्यात आली, तर हाताने तयार केलेल्या गालिच्यांव्यतिरिक्त हस्तकला उत्पादनांच्या निर्यातीत विशेष उल्लेखनीय 41.4% वाढ झाली. सर्व प्रकारच्या वस्त्रोद्योगातील तयार कपड्यांच्या निर्यातीतही सकारात्मक वाढ कायम राहिली असून, या महिन्यात त्यात 6.1% वाढ झाली.

एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीतील एकत्रित कामगिरीही उत्साहवर्धक राहिली. या कालावधीत कापड उत्पादनांच्या निर्यातीत 18.0%, मानवनिर्मित वस्त्रोद्योग उत्पादनांमध्ये 13.6%, गालिच्यांमध्ये 11.9% आणि हस्तकला उत्पादनांमध्ये 44.0% वाढ झाली.

प्रमुख विभागांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ ही भारताच्या वस्त्रोद्योग निर्यात क्षेत्राची वाढती स्पर्धात्मकता आणि निर्यात उत्पादनांच्या विविधीकरणाचे प्रतिबिंब आहे. बाजारपेठेतील सुधारित प्रवेश, धोरणात्मक उपाययोजना तसेच मूल्यवर्धन आणि बाजारपेठांच्या वैविध्यीकरणासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या वाढीला पाठबळ मिळत आहे. उत्पादन क्षेत्र, रोजगारनिर्मिती आणि भारताच्या एकूण निर्यातवाढीत वस्त्रोद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान कायम आहे.


राधिका अघोर/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2311648) अभ्यागत कक्ष : 6