पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत स्थैर्याचे केंद्र आणि विकासाचा प्रमुख वाहक म्हणून ठळकपणे पुढे आल्याचे अधोरेखित करणारा लेख पंतप्रधानांकडून सामायिक

Posted On: 17 SEP 2026 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरीश साळवे यांच्या लेखाचा उल्लेख करत तो सामायिक केला. या लेखात, जागतिक अशांततेच्या काळात भारत देश स्थैर्याचे केंद्र आणि विकासाचा प्रमुख वाहक म्हणून ठळकपणे पुढे आला आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

साळवे यांनी याचे श्रेय पंतप्रधानांचे स्थिर नेतृत्व आणि राजकीय सातत्य यांना दिले आहे. राष्ट्रीय दिशेबाबतच्या स्पष्ट दृष्टिकोनामुळे भारताची अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि दीर्घकालीन राष्ट्रनिर्माण अधिक बळकट झाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:

“अशांततेच्या काळात भारत स्थैर्याचे केंद्र आणि विकासाचा प्रमुख वाहक म्हणून ठळकपणे पुढे आला आहे, असे हरीश साळवे यांनी लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(@narendramodi) यांच्या स्थिर नेतृत्वाला आणि राजकीय सातत्याला याचे श्रेय देताना ते म्हणतात की, राष्ट्रीय दिशेबाबतच्या स्पष्ट दृष्टिकोनामुळे भारताची अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि दीर्घकालीन राष्ट्रनिर्माण अधिक बळकट झाले आहे.”


राधिका अघोर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311587) अभ्यागत कक्ष : 5