श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्वच्छता आणि प्रशासकीय कार्यक्षमता केली बळकट

Posted On: 17 SEP 2026 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिक स्वच्छ, अधिक कार्यक्षम आणि जबाबदारीने प्रतिसाद देणाऱ्या सरकारच्या दूरदृष्टीनुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालय, त्याच्या स्वायत्त संस्था आणि क्षेत्रीय विभागांमधील स्वच्छतेला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी तसेच प्रशासकीय प्रलंब कमी करण्यासाठी उद्दिष्ट साध्य उपाययोजना हाती घेत आहे.

महत्वपूर्ण कामगिरी: डिसेंबर 2025 – ऑगस्ट 2026

416 प्रत्यक्ष दस्तावेजांचे निष्कासन: कालबाह्य आणि अनावश्यक प्रत्यक्ष छापील कागदी दस्तावेज ओळखण्याच्या आणि काढून टाकण्याच्या एका व्यापक मोहिमेमुळे कार्यालये अधिक सुव्यवस्थित होण्यास, अभिलेख व्यवस्थापन सुधारण्यास आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यात मदत झाली आहे.

ई-ऑफिस पध्दतीचा 100% अवलंब: मंत्रालयाने ई-ऑफिस पध्दतीची संपूर्ण अंमलबजावणी साध्य केली आहे, ज्यामुळे कागदविरहित पध्दतीने कार्य करणे शक्य झाले असून त्यामुळे पारदर्शकता, उत्पादकता आणि प्रशासकीय सुलभता अधिक मजबूत झाली आहे.

98% सार्वजनिक तक्रारींचे निराकरण: प्राप्त झालेल्या 2,18,472 सार्वजनिक तक्रारींपैकी 2,13,805 तक्रारींचे यशस्वीपणे निराकरण करण्यात आले आहे, जे वेळेवर आणि नागरिक-केंद्रित सेवा देण्याप्रती मंत्रालयाची निरंतर वचनबद्धता दर्शवते.

98% तक्रार निवारण अपीलांचा निपटारा: प्राप्त झालेल्या 48,828 तक्रार निवारण अपीलांपैकी 47,850 अपीलांचे निवारण करण्यात आले आहे, ज्यामुळे मंत्रालयाचे प्रतिसादक्षम आणि उत्तरदायी शासनावर असलेले लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित होते

1,000 हून अधिक स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या: 1,000 हून अधिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, यातून स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुव्यवस्थित कार्यालय निर्माण करण्यासाठी मंत्रालयाचे सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित होतात.

पुढील वाटचाल: विशेष मोहीम 6: 02–31 ऑक्टोबर 2026

मंत्रालय सहाव्या विशेष मोहीमेची तयारी करत आहे, ज्याचा उद्देश स्वच्छतेला संस्थात्मक स्वरूप देणे, कामातील प्रलंब कमी करणे आणि प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणे हा आहे. ही मोहीम प्रभावी ई-कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये कालबाह्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ओळख, वर्गीकरण आणि पर्यावरणदृष्ट्या जबाबदार पध्दतीने विल्हेवाट करणे यांचा समावेश असेल. तसेच, ही मोहीम अभिलेख व्यवस्थापन, कार्यालयीन जागेचा सुयोग्य वापर आणि शाश्वत प्रशासकीय पद्धतींना प्रोत्साहन देईल, ज्यामुळे जबाबदार शासन, पारदर्शकता आणि नागरिक-केंद्रित या मंत्रालयाच्या दृष्टिकोनाप्रती असलेली वचनबद्धता अधिक दृढ होईल.

नितीन फुल्लुके /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2311427) अभ्यागत कक्ष : 8