अणुऊर्जा विभाग
AIC अणुशक्तीने उद्योगांसोबत 22 बीएआरसी तंत्रज्ञान हस्तांतरण करारांवर स्वाक्षरी केली
Posted On:
11 SEP 2026 12:35PM by PIB Mumbai
एआयसी बीएआरसी अणुशक्ती फाउंडेशनने (AIC ANUSHAKTI) तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सहयोग विभागाच्या सहकार्याने बुधवार, 09 सप्टेंबर 2026 रोजी 'तंत्रज्ञान हस्तांतरण आणि इनक्युबेशन करार स्वाक्षरी, उत्पादन अनावरण आणि प्रमाणपत्र वितरण' सोहळ्याचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात 22 तंत्रज्ञान हस्तांतरण करार, 2 इनक्युबेशन करार आणि 3 उत्पादनांचे अनावरण करण्यात आले. (सविस्तर माहिती www.aicanushakti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे). हस्तांतरित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानामध्ये अणुभट्ट्यांसाठी हायड्रोजन मिटिगेशन सिस्टीम, टेलि ईसीजी , कापड उद्योगातील सांडपाणी रंगहीन करणारी यंत्रणा (Textile effluent decolouring system), बोरॉन कार्बाइड उत्पादन आणि जैविक कचरा कन्व्हर्टर यांचा समावेश होता.
या कार्यक्रमादरम्यान भाभा अणुसंशोधन केंद्राच्या नॉलेज मॅनेजमेंट ग्रुपचे(केएमजी) संचालक डॉ. ए. के. दुरेजा यांनी एआयसी अणुशक्ती आणि तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सहयोग विभाग, केएमजी, बीएआरसी यांच्या उपक्रमांचा आढावा घेतला. बीएआरसी च्या अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस. गौतम यांनी अन्न तंत्रज्ञान आणि फूड इरॅडिएटर याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमात एक संवाद साधणारे आणि परस्परसंवादात्मक अभिप्राय सत्र झाले, ज्यामध्ये उद्योग परवानाधारकांनी पहिल्या प्रोटोटाइप विकासाचा त्यांचा प्रवास आणि BARC कडून मिळालेले मार्गदर्शन व सहकार्य याबद्दलचे अनुभव मांडले. तसेच बाजारपेठेच्या गरजेनुसार इनक्युबेशनअंतर्गत उत्पादनात सुधारणा करण्याचे आणि त्याचे व्यावसायिकीकरण करण्याचा आपला दृष्टीकोन स्पष्ट केला. तंत्रज्ञानातील बारकावे समजून घेण्यासाठी BARC च्या तंत्रज्ञान तज्ज्ञांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते.
एआयसी अणुशक्तीबद्दल:
एआयसी अणुशक्ती ही बीएआरसी ची तंत्रज्ञान भाषांतर शाखा (Technology Translation Arm) आहे आणि ती BARC तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणासाठी परवाने हस्तांतरित करते. हे केंद्र आपल्या इन-हाऊस इनक्युबेशनअंतर्गत या तंत्रज्ञानामध्ये मूल्यवर्धन करण्याचे कामही करते. उद्योगांवरील नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी सहयोगात्मक इनक्युबेशन देखील हाती घेतले जाते जिथे BARC कडून मार्गदर्शन पुरवले जाते. BARC 'आकृती' (AKRUTI) हा एक समर्पित ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम देखील चालवते.
अणुऊर्जा विभागाचे (DAE) प्रमुख बहुविद्याशाखीय संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या स्पिन-ऑफ तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणाद्वारे देशातील स्टार्टअप परिसंस्था सक्षम करण्यासाठी नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत एआयसी अणुशक्तीची स्थापना करण्यात आली आहे.
***
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2309190)
अभ्यागत कक्ष : 18