युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
माय भारत या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात विकसित भारत युवा नेतृत्व संवाद (व्हीबीवायएलडी) 2027 चे आयोजन
पंतप्रधानांबरोबरच्या राष्ट्रीय संवादात नवोन्मेषीय अर्थव्यवस्था, पर्यटन आणि सर्जनशील उद्योगक्षेत्राशी संबंधित उपाययोजना मांडण्यासाठी बहुस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे महाराष्ट्रातील युवा वर्गाला आवाहन
Posted On:
09 SEP 2026 7:38PM by PIB Mumbai
मुंबई, 9 सप्टेंबर 2026
माय भारत या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात विकसित भारत युवा नेतृत्व संवाद - 2027 चे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने केली आहे. विकसित भारत युवा नेतृत्व संवाद म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची पुनर्आखणी करून योजलेला उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत 15 ते 29 वयोगटातील तरुणांना त्यांच्या नवोन्मेषी कल्पना आणि उपाययोजना मांडण्यासाठी, एक पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित मंच उपलब्ध करून दिला जात आहे. या उपक्रमातील निवडक युवा प्रतिनिधींना, नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्याची तसेच विकसित भारत @2047 च्या संकल्पात योगदान देण्याची संधी मिळणार आहे.
विकसित भारत युवा नेतृत्व संवाद- 2027 या उपक्रमाचे महाराष्ट्रातील राज्यस्तरीय आयोजन दोन दिवसांचे असणार आहे. या आयोजनात या उपक्रमांतर्गतच्या विविध संकल्पनांचा मिलाफ साधला जाईल. हा सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील युवा वर्गाला आपले नेतृत्व, नवोन्मेष, सर्जनशीलता आणि विचार मांडण्यासाठी एक सामायिक मंच उपलब्ध होईल. या सोहळ्याच्या उद्घाटन आणि समारोप सत्रांच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री असणार आहेत.
महाराष्ट्रातील प्रादेशिक आव्हानात्मक उपक्रमांच्या संकल्पना: महाराष्ट्र हा गोव्यासह संपूर्ण कोकण प्रदेश या वित्तीय आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या प्रदेशांतर्गत येतो. विकसित भारत युवा नेतृत्व संवाद- 2027 या उपक्रमाअंतर्गत या विभागाकरता आखलेल्या संकल्पनेत, जागतिक पातळीवर स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी देशाच्या सर्जनशील, सांस्कृतिक, पर्यटन आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधील क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून करण्यावर भर दिला गेला आहे.
|
निकष
|
महाराष्ट्र / प्रदेश 8 चा तपशील
|
|
प्रदेशाचे नाव
|
कोकण – वित्तीय आणि सर्जनशील अर्थव्यवस्था प्रदेश
|
|
समावेश असलेली राज्ये
|
महाराष्ट्र, गोवा
|
|
आव्हानात्मक उपक्रमांची संकल्पना
|
नवोन्मेष अर्थव्यवस्था, पर्यटन आणि सर्जनशील उद्योग क्षेत्र
|
|
प्रश्न
|
देशाला जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी भारत आपल्या सर्जनशील, सांस्कृतिक आणि नवोन्मेषीय अर्थव्यवस्थेचा कसा वापर करू शकतो?
|
विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 ( व्हीबीवायएलडी) – उद्दिष्टे:
• विविध सांस्कृतिक, प्रादेशिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्याला चालना देणे.
• देशाच्या विविध भागांतील तरुणांना आपापसांत संवाद साधण्यासाठी, विविध संस्कृती समजून घेण्यासाठी आणि भारताच्या विविधतेचा आदर करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे.
• तरुणांना देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे.
• लोकगीत, लोकनृत्य, चित्रकला, वक्तृत्व, काव्यलेखन आणि इतर प्रकारांद्वारे युवा नेतृत्व आणि विविध गुणांचे सादरीकरण करणे.
• ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी युवा-प्रणित उपायांना प्रोत्साहन देणे आणि एका राष्ट्रीय युवा संवादाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे.
• 'यंग आंत्रप्रेन्युअर्स स्टार्ट-अप चॅलेंज' म्हणजे ‘युवा उद्योजक स्टार्ट-अप आव्हान’ आणि एकात्मिक 'यूथ पार्लमेंट' म्हणजे ‘एकात्मिक युवा संसद’ यांसारख्या नवीन प्रकारांद्वारे संधींचा विस्तार करणे.
• जिल्हास्तरीय सहभागापासून ते पंतप्रधानांसोबतच्या राष्ट्रीय संवादापर्यंत एक संरचनात्मक मार्ग तयार करणे.
• 'विकसित भारत @2047' दृष्टिकोनांतर्गत तरुणांना प्रदेशनिहाय विकासाच्या प्राधान्यक्रमांमध्ये थेट योगदान देणारे भागीदार म्हणून स्थान देणे.
• पारदर्शक, गुणवत्तेवर आधारित आणि बहु-स्तरीय निवड प्रक्रियेद्वारे युवा नेतृत्वाची ओळख पटवणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि रचना :
• पात्रता: 17 ऑगस्ट 2026 रोजी 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुण.
• सहा मुख्य प्रकार : विकसित भारत आव्हान विभाग ; सांस्कृतिक विभाग (लोकगीत/लोकनृत्य, वक्तृत्व, चित्रकला आणि काव्यलेखन); भारतासाठी संकल्पना (डिझाइन फॉर इंडिया); सामाजिक उद्दिष्टांसाठी नावीन्यपूर्ण उपाय (हॅक फॉर सोशल कॉज); युवा उद्योजक आव्हान (यूथ आंत्रप्रेन्युअर्स चॅलेंज); आणि युवा संसद (यूथ पार्लमेंट).
• बहु-स्तरीय निवड प्रक्रिया: विकसित भारत क्विझ ही प्रश्नमंजूषा→ निबंध स्पर्धा → जिल्हा स्पर्धा → राज्य व्हीबीवायएलडी → राष्ट्रीय व्हीबीवायएलडी .
• जिल्हा स्तर: जिल्ह्यात राहणारा किंवा शिकणारा कोणताही तरुण नोंदणी करू शकतो.
• नोंदणी: सर्व सहभागींसाठी 'माय भारत' पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा आणि राज्य स्तरावरील अर्ज प्रक्रिया:
• जिल्हा फेरी: जिल्हास्तरीय सादरीकरणाचे विषय महाराष्ट्रातील स्थानिक प्राधान्यक्रम आणि संधी लक्षात घेऊन विशेषतः तयार केलेल्या प्रादेशिक संकल्पनेवर आधारित असतील.
• राज्य व्हीबीवायएलडी: राज्य व्हीबीवायएलडी दरम्यान जिल्हा स्तरावरून पात्र ठरलेले स्पर्धक राज्य परीक्षक मंडळासमोर (ज्युरी) वैयक्तिक सादरीकरण करतील. राज्य स्तरावरील कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय फेरीसाठी राज्य संघाची निवड केली जाईल.
राष्ट्रीय पातळी – महाराष्ट्रातील निवड झालेले स्पर्धक प्रादेशिक संकल्पनेअंतर्गत राष्ट्रीय पथकात सहभागी होतील. प्रादेशिक पातळीवरच्या अंतिम फेरीतील स्पर्धक आपल्या संकल्पना पंतप्रधानांसमोर सादर करतील.
स्पर्धेचे वेळापत्रक
पहिला टप्पा – विकसित भारत प्रश्नमंजुषा (डिजिटल) –17 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026
दुसरा टप्पा – विकसित भारत निबंध (डिजिटल) – 5 ऑक्टोबर 2026 ते 19 ऑक्टोबर 2026
निबंध मूल्यांकन – 22 ऑक्टोबर 2026 ते 4 नोव्हेंबर 2026
तिसरा टप्पा – जिल्हास्तरीय अजिंक्यपद – 10 नोव्हेंबर 2026 ते 16 नोव्हेंबर 2026
चौथा टप्पा – व्हीबीवायएलडी राज्य पातळी – 17 नोव्हेंबर 2026 ते 7 डिसेंबर 2026
पाचवा टप्पा – व्हीबीवायएलडी राष्ट्रीय संवाद, नवी दिल्ली – 10 जानेवारी 2027 ते 12 जानेवारी 2027
सांस्कृतिक स्पर्धा – राष्ट्रीय स्तरावरील सहभाग
लोकनृत्य व लोकसंगीत – राष्ट्रीय पातळीवर 7 अधिक 3 स्पर्धक, 18 ते 40 वयोगटातील मदतनीसांसह
चित्रकला – प्रत्येक राज्यातील 2 स्पर्धक
वक्तृत्व – प्रत्येक राज्यातील 1 स्पर्धक
काव्यलेखन – प्रत्येक राज्यातील 1 स्पर्धक
(वक्तृत्वासाठीचे भाषण व काव्यलेखन राज्याची अधिकृत भाषा किंवा हिंदी किंवा इंग्रजीतून सादर करता येईल)
नवी दिल्लीत होणारी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा –
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी निवडलेले स्पर्धक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होतील. विकसित भारत चॅलेंज ट्रॅकसाठी निवड झालेले राज्यातले स्पर्धक आपल्या संकल्पना विषयतज्ज्ञ, सचिव व केंद्रीय मंत्र्यांसमोर सादर करतील. राज्य पातळीवर अंतिम फेरीत निवड झालेले स्पर्धक पंतप्रधानांसमोर सादरीकरण करतील.
अधिक माहितीसाठी https://mybharat.gov.in/vbyld-2027 या संकेतस्थळाला भेट द्या.
व्हीबीवायएलडी 2027 मध्ये महाराष्ट्रातील युवक युवतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि विकसित भारत 2047 व विकसित महाराष्ट्रासाठी आपल्या संकल्पना, सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि उपाय सादर करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
स्रोत – माय भारत - महाराष्ट्र
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर /निलीमा चितळे/ तुषार पवार/आशुतोष सावे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308481)
अभ्यागत कक्ष : 15