अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर येथील आयकर विभागाद्वारे 19 सप्टेंबर रोजी 20 व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन


राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातील रोजगाराभिमुख कार्यक्रमात नवनियुक्त उमेदवार सहभागी होणार

Posted On: 08 SEP 2026 4:33PM by PIB Mumbai

नागपूर, 8 सप्टेंबर 2026

 

नागपूर येथील आयकर विभाग 19 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय', नागपूर येथे 'राष्ट्रीय रोजगार मेळाव्या'च्या 20 व्या टप्प्याचे आयोजन करणार आहे. या कार्यक्रमात नव्याने नियुक्त झालेले उमेदवार, वरिष्ठ अधिकारी आणि सहभागी विभागांचे प्रतिनिधी एकत्र येणार असून, सार्वजनिक सेवेतील आपला व्यावसायिक प्रवास सुरू करणाऱ्या उमेदवारांसाठी हा कार्यक्रम महत्वाचा ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना संबोधित करतील. मंत्री दर्जाचे केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. 'रोजगार मेळाव्या'त मोठ्या संख्येने नवनियुक्त उमेदवार सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपली नियुक्ती आणि व्यावसायिक जीवनातील नवीन टप्प्याची सुरुवात, याचा आनंद साजरा करण्याची संधी मिळेल.

'राष्ट्रीय रोजगार मेळावा' हा सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. याचा उद्देश तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि विविध विभाग आणि संस्थांमधील मनुष्यबळ बळकट करणे, हा आहे. यामधून, रोजगार निर्मिती, युवा सक्षमीकरण आणि तरुणांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर असलेला सरकारचा भर दिसून येतो.

नागपूर येथील कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी विभागांचे उमेदवार आणि प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. याद्वारे जनसेवेचे महत्त्व आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन पिढीसाठी उपलब्ध असलेल्या संधींवर प्रकाश टाकला जाईल.

पीआयबी मुंबई |नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2307857) अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein: English