कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चार सप्टेंबर 2026 पर्यंत देशभरात, 1086.31 लाख हेक्टरवर खरीपाची लागवड


डाळी, ताग आणि मेस्ता पिकांच्या लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ

Posted On: 08 SEP 2026 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  8 सप्टेंबर 2026

All India: Progressive Crop Area Sown Report - Kharif Weekly area coverage as on 2026-09-04

Source: CWWG

Area in Lakh Ha

 

 

Normal (DA&FW)

Area Sown

Difference In Area Coverage Over

S. No.

Crop

 

2026-27

2025-26

2025-26

1

Rice

412.00

421.82

438.19

-16.37

2

Total Pulses

123.63

117.13

115.30

1.84

a

Tur

44.31

45.66

44.93

0.72

b

Urad

29.60

25.15

22.46

2.68

c

Moong

35.48

33.19

34.23

-1.04

d

Kulthi

1.48

0.38

0.41

-0.03

e

Moth Bean

9.69

9.23

9.19

0.04

f

Other Pulses

3.07

3.53

4.07

-0.53

3

Shri Anna cum Coarse Cereals

182.63

181.39

182.48

-1.09

a

Jowar

14.44

13.58

12.61

0.97

b

Bajra

70.94

64.86

62.87

1.99

c

Ragi

12.01

7.60

8.77

-1.17

d

Small Millets

4.47

4.26

4.15

0.11

e

Maize

80.77

91.09

94.08

-2.99

4

Total Oilseeds

200.08

191.99

193.06

-1.07

a

Groundnut

46.79

49.61

50.44

-0.83

b

Soybean

128.71

121.82

122.98

-1.16

c

Sunflower

1.20

1.25

0.64

0.61

d

Sesamum

12.88

10.94

9.50

1.44

e

Nigerseed

1.01

0.46

0.41

0.05

f

Castorseed

9.49

7.79

9.02

-1.23

g

Other Oilseeds

 

0.12

0.07

0.04

5

Sugarcane

54.20

58.47

58.87

-0.40

6

Total Jute and Mesta

6.39

6.34

6.24

0.10

a

Jute

6.03

6.13

6.03

0.11

b

Mesta

0.37

0.21

0.21

0.00

7

Cotton

125.51

109.17

109.87

-0.69

 

Grand Total

1104.46

1086.31

1104.00

-17.69

तांदूळ :

तांदळाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्राची नोंद सुमारे 421 .82 लाख हेक्टर झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत हे क्षेत्र 438.19 लाख हेक्टर होते. त्यामुळे यंदा तांदळाच्या क्षेत्रात 16.37 लाख हेक्टरची घट झाली आहे.

तांदळाच्या क्षेत्रात सर्वाधिक घट कर्नाटक (4.28 लाख हेक्टर), तेलंगणा (3.61 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (1.84 लाख हेक्टर), आंध्र प्रदेश 1.91 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (1.75 लाख हेक्टर), तामिळनाडू (1.32 लाख हेक्टर), झारखंड (1.38 लाख हेक्टर), महाराष्ट्र (1.15 लाख हेक्टर) आदी राज्यांमध्ये नोंदवण्यात आली आहे. तर आसाम (०.52 लाख हेक्टर), ओडिशा (0.29 लाख हेक्टर) आदी राज्यांमध्ये तांदळाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. एकूणच, तांदळाच्या क्षेत्रातील घट मुख्यतः कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये झालेल्या कमी लागवडीमुळे नोंदली गेली आहे.

डाळी :

डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र, सुमारे 117.13 लाख हेक्टर नोंदवण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे क्षेत्र 115.30 लाख हेक्टर होते. त्यामुळे यंदा डाळींच्या लागवड क्षेत्रात 1.84 लाख हेक्टरची वाढ झाली आहे. डाळींच्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ उत्तर प्रदेश (3.97 लाख हेक्टर), झारखंड (0.98 लाख हेक्टर), तेलंगणा (0.90 लाख हेक्टर), राजस्थान (0.57 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.38 लाख हेक्टर) आदी राज्यांमध्ये नोंदवण्यात आली आहे.

दुसरीकडे, डाळींच्या क्षेत्रात सर्वाधिक घट महाराष्ट्र (2.60 लाख हेक्टर), कर्नाटक (2.07 लाख हेक्टर), ओडिशा (0.61 लाख हेक्टर) आदी राज्यांमध्ये नोंदवण्यात आली आहे. एकूणच, डाळींच्या लागवड क्षेत्रातील वाढीस उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील वाढीव लागवड कारणीभूत ठरली आहे. या राज्यांतील वाढीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओडिशा येथे नोंदवण्यात आलेली घट भरून निघाली आहे.

श्री अन्न आणि भरड धान्ये :

श्री अन्न आणि भरड धान्यांच्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे 181.39 लाख हेक्टर नोंदवण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत हे क्षेत्र 182.48 लाख हेक्टर होते. त्यामुळे यंदा या पिकांच्या क्षेत्रात 1.09 लाख हेक्टरची घट झाली आहे. या क्षेत्रात सर्वाधिक घट कर्नाटक (5.64 लाख हेक्टर), महाराष्ट्र (2.41 लाख हेक्टर), आंध्र प्रदेश (0.62 लाख हेक्टर), तामिळनाडू (0.24 लाख हेक्टर) आदी राज्यांमध्ये नोंदवण्यात आली आहे. तर राजस्थान (2.90 लाख हेक्टर), छत्तीसगड (1.69 लाख हेक्टर), ओडिशा (0.85 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.80 लाख हेक्टर), बिहार (0.72 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (0.63 लाख हेक्टर), झारखंड (0.41 लाख हेक्टर), उत्तराखंड (0.38 लाख हेक्टर) आदी राज्यांमध्ये लागवडीच्या क्षेत्रात वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूणच, मुख्यतः कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात लागवड तुलनेने कमी झाल्याने, एकूण घट वाढली आहे. तसेच आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथील  कमी लागवडीमुळेही ही घट वाढली आहे. या राज्यांमधील घट राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंड येथे नोंदवलेल्या क्षेत्रवाढीपेक्षा अधिक आहे.

तेलबिया: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 193.06 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी सुमारे 191.99 लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची पेरणी झाली असून यात 1.07 लाख हेक्टरची घट झाल्याचे दिसून येते. राजस्थान (2.23 लाख हेक्टर), गुजरात (1.93 लाख हेक्टर), कर्नाटक (0.37 लाख हेक्टर) इत्यादी राज्यांमध्ये लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाली. उत्तर प्रदेश (2.91 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (1.14 लाख हेक्टर), इत्यादी राज्यांमध्ये पेरणी क्षेत्रातील वाढ दिसून आली एकंदरीत, तेलबिया क्षेत्राच्या व्याप्तीतील घट ही प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातमधील लक्षणीय कपातीला कारणीभूत असून, यामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात नोंदवलेल्या वाढीचा प्रभाव कमी झाला.

ऊस: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 58.87 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे 58.47 लाख हेक्टर क्षेत्र उसाच्या लागवडीखाली नोंदवले गेले असून, लागवड क्षेत्रात 0.40 लाख हेक्टरने घट झाल्याचे दिसून येते.  बिहार (0.30 लाख हेक्टर), उत्तराखंड (0.20 लाख हेक्टर) इत्यादी राज्यांमध्ये लागवड क्षेत्रात मोठी घट नोंदवली गेली. उत्तर प्रदेश (0.36 लाख हेक्टर), हरियाणा (0.21 लाख हेक्टर) इ. राज्यांमध्ये जास्त क्षेत्रावर लागवडीची नोंद झाली. एकूणच, ऊस लागवड क्षेत्राच्या व्याप्तीतील घट प्रामुख्याने बिहार आणि उत्तराखंड या राज्यांमधील लागवड क्षेत्रात घट झाल्याचा परिणाम असून, ही घट उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील लागवड क्षेत्रातील वाढीपेक्षा जास्त आहे.

ताग आणि मेस्ता: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 6.24 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत, ताग आणि मेस्ता पिकांखालील क्षेत्र सुमारे 6.34 लाख हेक्टर असल्याचे नोंदवले गेले. म्हणजेच यात 0.10 लाख हेक्टरची वाढ झाली. लागवड क्षेत्रातील ही प्रमुख वाढ प्रामुख्याने बिहार (0.11 लाख हेक्टर), पश्चिम बंगाल (0.06 लाख हेक्टर) यांसारख्या राज्यांमध्ये दिसून आली. दुसरीकडे, आसाम (0.07 लाख हेक्टर), आंध्र प्रदेश (0.01 लाख हेक्टर),  यांसारख्या राज्यांमध्ये लागवड क्षेत्रात घट नोंदवली गेली. एकंदरीत, ताग आणि मेस्ता या पिकांच्या लागवड क्षेत्रात झालेली ही वाढ प्रामुख्याने बिहार आणि पश्चिम बंगालमधील अधिक लागवडीमुळे शक्य झाली. या राज्यांमधील वाढ आसाम आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील कपातीपेक्षा अधिक आहे.  

कापूस: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 109.87 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे 109.17 लाख हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली नोंदले गेले, जे 0.69 लाख हेक्टरने कमी झाल्याचे दर्शवते. राजस्थान (1.05 लाख हेक्टर), हरियाणा (0.90 लाख हेक्टर), पंजाब (0.43 लाख हेक्टर) इत्यादी राज्यांमध्ये लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाली. दुसरीकडे, प्रामुख्याने तेलंगणा (1.14 लाख हेक्टर), गुजरात (0.66 लाख हेक्टर) इ. राज्यांमध्ये जास्त क्षेत्रावर  लागवडीची नोंद. एकूणच, कापूस लागवड क्षेत्राच्या व्याप्तीतील घट प्रामुख्याने राजस्थान आणि हरियाणामध्ये मोठी घट झाल्याचा, तसेच पंजाबमध्ये घट झाल्याचा परिणाम असून, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांमध्ये नोंदवल्या गेलेल्या वाढीपेक्षा तो अधिक आहे.

 

शैलेश पाटील/राधिका अघोर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2307843) अभ्यागत कक्ष : 16