पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीतील सत्य निकेतन येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 06 SEP 2026 8:24PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील सत्य निकेतन येथे इमारत कोसळल्याच्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रति पंतप्रधानांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. या घटनेनंतर अधिकारी घटनास्थळी सक्रियपणे कार्यरत असून, दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना मदत केली जात असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे :

दिल्लीतील सत्य निकेतन येथे इमारत कोसळल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. अधिकारी घटनास्थळी कार्यरत असून, या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्यांना मदत करत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी.”

***

शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2307267) अभ्यागत कक्ष : 14