गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तिरंदाजी संघटनेच्या ‘वर्ल्ड आर्चरी पॅरा सीरिज’चे, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले उदघाटन


भारत विविध प्रकारच्या क्रीडा प्रशिक्षणासोबतच क्रीडा सुविधा आणि सामग्री निर्मितीचेही केंद्र बनेल

भारताचे उद्दिष्ट केवळ अधिकाधिक पदके जिंकण्यापुरते मर्यादित नसून ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, पोलीस क्रीडा स्पर्धा अशा इतर स्पर्धांमध्ये खेळाला बळकटी देण्याचे आहे

केवळ खेळणे,सराव किंवा प्रशिक्षण यातून विजेते घडत नाहीत तर विजिगीषू वृत्ती आणि सातत्यपूर्ण कठोर मेहनतीतून ते घडतात,विजेते होण्याचा खरा पाया खेळाडूची इच्छाशक्ती, समर्पण आणि जिंकण्याच्या दृढ निर्धारशक्तीतून रचला जातो

Posted On: 04 SEP 2026 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, भारतीय तिरंदाजी संघटनेच्या ‘वर्ल्ड आर्चरी पॅरा सीरिज’चे उदघाटन केले. दिनांक 5 ते 9 सप्टेंबर 2026या कालावधीत होणारी ही स्पर्धा खेळाडू आणि अहमदाबादसाठीही संस्मरणीय ठरेल, असे शाह यांनी यावेळी सांगितले. 

आगामी काळात अहमदाबाद, गुजरात आणि भारत हे क्रीडा विश्वातील प्रमुख केंद्र म्हणून उदयास येतील. तसेच, भारत हा सर्व प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण आणि क्रीडा सुविधा व सामग्री निर्मितीचे केंद्र बनेल, असे केंद्रीय मंत्री शाह यावेळी म्हणाले. याच व्यापक दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपण देशाला जगातील सर्वात मोठे क्रीडा केंद्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे ते म्हणाले. 

CR3_0247.JPG (1).jpeg

भारताचे उद्दिष्ट केवळ अधिकाधिक पदके जिंकण्यापुरते मर्यादित नसून ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, पोलीस क्रीडा स्पर्धा अशा इतर स्पर्धांमध्ये खेळाला बळकटी देण्याचे आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. येथे उपलब्ध अत्याधुनिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुविधा अहमदाबाद, गुजरात किंवा भारतापुरत्या  मर्यादित राहणार नाहीत. उलट आंतरराष्ट्रीय दर्जा लक्षात घेऊन या सुविधा विकसित केल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. 

भूतान, ब्रिटन, चीन, बांगलादेश, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया आणि अमेरिका यांसारख्या 19 देशांतील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहिती शाह यांनी दिली. या वर्ल्ड आर्चरी पॅरा सीरिजमध्ये सहभागी 19 देशातल्या 108 खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. ''तुम्ही भारतात आला आहात, आमची मूळ संस्कृतीच वसुधैव कुटुंबकम आहे,'' असे शाह म्हणाले.  हरविंदर सिंग, शीतल देवी, राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी आणि पायल नाग यांसारख्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढवला आहे.

सन 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, शताब्दी स्पर्धा असून अहमदाबाद या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले. केवळ खेळणे,सराव किंवा प्रशिक्षण यातून विजेते घडत नाहीत तर विजिगीषू वृत्ती आणि सातत्यपूर्ण कठोर मेहनतीतून ते घडतात, विजेते होण्याचा खरा पाया खेळाडूची इच्छाशक्ती, समर्पण आणि जिंकण्याच्या दृढ निर्धारशक्तीतून रचला जातो, असे त्यांनी सांगितले.  

 

* * *

निलिमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306865) अभ्यागत कक्ष : 9