संरक्षण मंत्रालय
सर्जन व्हाइस ॲडमिरल दिलीप राघवन यांनी महासंचालक रुग्णालय सेवा (सशस्त्र सेना) पदाचा स्वीकारला कार्यभार
Posted On:
02 SEP 2026 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2026
सर्जन व्हाइस ॲडमिरल दिलीप राघवन, व्हीएसएम यांनी 1 सप्टेंबर 2026 रोजी सशस्त्र सेना महासंचालक रुग्णालय सेवा या पदाचा पदभार स्वीकारला.
चेन्नई आणि मुंबई येथे शिक्षण घेतलेले सर्जन व्हाइस ॲडमिरल दिलीप राघवन 1985 मध्ये पुण्यात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) दाखल झाले आणि 1989 मध्ये त्यांनी एमबीबीएस पदवी पूर्ण केली. त्यानंतर 26 डिसेंबर 1989 रोजी ते भारतीय नौदलात रुजू झाले.
आपल्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. यामध्ये दक्षिण नौदल कमान व पूर्व नौदल कमानचे कमांड मेडिकल ऑफिसर तसेच मुंबईच्या आयएनएस अश्विनी चे कमांडिंग ऑफिसर यांसारख्या प्रमुख पदांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यकाळात आयएनएस अश्विनी या रुग्णालयाला सर्वोत्कृष्ट कमांड हॉस्पिटलसाठीचा 'रक्षा मंत्री चषक' देऊन गौरविण्यात आले होते.
त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन 26 जानेवारी 2026 रोजी त्यांना 'विशिष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आले.
व्हाइस ॲडमिरल राघवन यांच्या पत्नी डॉ. मिशेल व्हाज या बालरोगतज्ज्ञ असून त्यांनी बाल विकास न्यूरोलॉजी या विषयात विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्या स्वतः पुणे इथल्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी भारतीय नौदलात अल्पमुदत सेवा अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.

* * *
सुवर्णा बेडेकर/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306058)
अभ्यागत कक्ष : 11