विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

योग्य लाभार्थ्यांना पाठबळ मिळावे यासाठी 1 लाख कोटी रुपयांच्या 'आरडीआय' (RDI) निधीबाबत भागधारकांमध्ये अधिक व्यापक जागरूकता निर्माण करण्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे आवाहन

Posted On: 01 SEP 2026 6:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज 1 लाख कोटी रुपयांच्या "संशोधन, विकास आणि नवोन्मेष निधी" (RDI Fund) बाबत भागधारकांमध्ये अधिक जागरूकता आणि प्रसार करण्याचे आवाहन केले. जेणेकरून योग्य अर्जदारांना याचा उद्देश, पात्रता आणि पाठबळ मिळवण्याची प्रक्रिया स्पष्टपणे समजू शकेल.

'तंत्रज्ञान विकास मंडळ' (TDB) च्या 30 व्या स्थापना दिन कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते.आरडीआय  निधीमागील मुख्य उद्देश, या पाठबळासाठी पात्र असलेले भागधारक व कंपन्या, आणि ते या निधीचा कसा लाभ घेऊ शकतात याबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मोठ्या संख्येने प्राप्त होणारे अर्ज हे या निधीच्या उद्देशाबद्दल अधिक स्पष्टता आणि व्यापक प्रसाराची गरज दर्शवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हजारो अर्ज प्राप्त होत असून यात अशा अर्जदारांचाही समावेश आहे ज्यांना आरडीआय निधीचे स्वरूप आणि उद्देश पूर्णपणे समजलेला दिसत नाही, अशी माहिती त्यांनी दिली. हा निधी म्हणजे केवळ अर्थसहाय्याचा आणखी एक स्रोत किंवा पारंपारिक कर्ज सुविधा आहे, या गैरसमजाविरुद्ध त्यांनी सावध केले आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेबद्दल कोणतीही गैरसमजूत राहणार नाही याची खात्री करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

तंत्रज्ञान विकास आणि संशोधनाला अशा प्रकारे पाठबळ देणे हा आरडीआय  निधीचा उद्देश आहे, ज्यामुळे विज्ञान व संशोधनाच्या प्रगतीला हातभार लागेल आणि या उपक्रमांना राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या एकूण वाढीचा भाग बनवता येईल, असे त्यांनी सांगितले.

निधी वितरणाची प्रक्रिया आधीच पारदर्शक आहे आणि त्यात योग्य ती सुरक्षा व्यवस्था कार्यरत आहे, तरीही जिथे शक्य असेल तिथे अधिक सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी सरकार सूचनांचे स्वागत करेल, यावर मंत्र्यांनी भर दिला. ते म्हणाले की, प्रसार आणि जागरूकता आणखी वाढवण्यास वाव आहे. योग्य जागरूकतेमुळे वैज्ञानिक व संशोधनाच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्रीय आर्थिक वाढीतील त्याच्या योगदानासाठी योग्य व्यक्तींना या पाठबळाचा लाभ घेण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

 

* * *

सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305618) अभ्यागत कक्ष : 7